कोकण

सज्जनशक्तीला राष्ट्र कार्यासाठी प्रेरित करा

CD

- rat६p१०.JPG-
२५N९६८०३
लांजा ः येथे विजयादशमीनिमित्त झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित डॉ. पंकज दिघे, सुभाष राणे, लक्ष्मण कोकरे आदी.

सज्जनशक्तीला राष्ट्रकार्यासाठी प्रेरित करा
डॉ. पंकज दिघे ः लांज्यात विजयादशमी उत्सव कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ६ ः समाजात अजूनही ८० टक्के सज्जनशक्ती आहे. त्या सज्जनशक्तीला संघटित करून समाजासाठी तसेच राष्ट्रकार्यासाठी प्रेरित करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मालवण येथील विभाग सहकार्यवाह डॉ. पंकज दिघे यांनी केले.
लांजा येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम त्रिमूर्ती मंगल कार्यालयात झाला. या प्रसंगी वारकरी संप्रदाय आणि मराठा समाजाचे अध्यक्ष सुभाष राणे, तालुका संघचालक लक्ष्मण कोकरे हे उपस्थित होते. या वेळी डॉ. दिघे म्हणाले, संघाची स्थापना १९२५ मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर डॉ. केशव हेडगेवार यांनी केली. संघाच्या कार्याला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने विजयादशमीपासून पुढील एक वर्ष शताब्दी वर्ष म्हणून विविध कार्यक्रमाने साजरी करायची संघाने ठरवले आहे. पुढील वर्षभरात व्यापक गृहसंपर्क अभियान, सामाजिक सद्भाव बैठक, युवकांसाठी कार्यक्रम, हिंदू संमेलन, प्रमुख नागरिक संवाद आणि शाखा सप्ताह आदी कार्यक्रम आयोजित केले जातील, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रथेनुसार, सुरुवातीला प्रस्तावना आणि त्यानंतर शस्त्रपूजन करण्यात आले. आमदार किरण सामंत तसेच पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Kagal : हसन मुश्रीफांच्या मनातलं आलं ओठावर, समरजित घाटगेंसोबत मनोमिलन करणाऱ्या अदृश्य शक्तीचं नाव केलं उघड; मंडलिकांवरही म्हणाले...

Credit Card Offer: लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड ऑफर! कमी क्रेडिट स्कोअर असला तरीही चालेल! काय आहे ही नवी ऑफर?

Latest Marathi News Live Update : आंदेकर टोळीचे गुंड पोलिसांच्या ताब्यात; कृष्णा, अभिषेक आणि शिवराज आंदेकरची धिंड काढली

आजारी पत्नीवर जादूटोणा करण्याचा प्रकार उघड! 'शेतात चाललं होतं भयानक कांड'; संगमनेर तालुक्यातील धक्कादायक घटना समोर..

मैत्री असावी तर अशी! बेस्ट फ्रेंड अमृतासाठी प्राजक्ता माळीने पाठवलं 'खास' गिफ्ट

SCROLL FOR NEXT