swt612.jpg
96809
देवगडः प्राथमिक शिक्षकांच्या अभ्यास दौऱ्यात सहभागी शिक्षक.
‘भुदरगड’ शिष्यवृत्ती पॅटर्नचा अभ्यास
शिक्षकांची चार शाळांना भेटः देवगड पंचायत समितीतर्फे अभ्यासदौरा
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ६ः येथील पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुक्यातील पडेल प्रभागातील प्राथमिक शिक्षकांचा भुदरगड शिष्यवृत्ती पॅटर्न अभ्यासण्यासाठी भुदरगड येथे अभ्यास दौरा काढण्यात आला. अभ्यास दौऱ्यात २८ शिक्षकांनी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील चार शाळांना भेटी दिल्या
जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शाळांतील मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण धोरणास अनुसरून हा अभ्यासदौरा प्रभारी गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे व शिक्षण विस्तार अधिकारी श्रीरंग काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पडेल तसेच गिर्ये केंद्रबलाचे केंद्रप्रमुख अशोक जाधव यांच्या नेतृत्वात झाला. पडेल व गिर्ये केंद्रातील शिष्यवृत्ती परीक्षेला मार्गदर्शन करणाऱ्या २८ शिक्षकांनी अभ्यास दौऱ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील चार शाळांना भेट दिली. यासाठी भुदरगड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रबोध कांबळे व तालुक्यातील तोरसोळे केंद्रशाळेचे उपक्रमशील शिक्षक सुनील कोदले यांचे सहकार्य मिळाले.
भुदरगड शिष्यवृत्ती पॅटर्नचे वेगळेपण अभ्यासण्यासाठी तेथील प. बा. पाटील विद्यालय (मुधाळ), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श विद्यालय (खानापूर), विद्यामंदिर (सोनाळी) व केंद्रीय विद्यालय (गारगोटी) या शाळांना भेटी देऊन शिष्यवृत्तीला मार्गदर्शन करणार्या अध्यापकांशी संवाद साधण्यात आला. राज्याच्या गुणवत्ता यादीत पहिल्या व तिसऱ्या क्रमांकाचे यश मिळवणाऱ्या विद्यामंदिर सोनाळीचे शिक्षक व शिक्षिकांचे प्रेरणादायी अनुभव ऐकले. विद्यार्थ्यांचा अध्ययन सराव होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या घटकवार शिष्यवृत्ती परीक्षांचा सराव, ऑक्टोबरपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करणे, सराव परीक्षांचे पेपर काळजीपूर्वक तपासून त्यातील उणीवांवर मार्गदर्शन करणे, अचूक असे अतिरिक्त मार्गदर्शन करणे, मराठी व गणित विषयातील आवश्यक असे पाठांतर, पहिली ते पाचवीपर्यंतच्या मराठी पाठ्यपुस्तकातील संपूर्ण भाषाभ्यास शब्दार्थ, वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूह, अलंकारिक शब्द, व्याकरणातील अचूकता, बोर्डाच्या धर्तीवर प्रश्नसंच निर्मिती यांसारख्या अनेक बाबी समजून घेण्यात आल्या.
या अभ्यास दौऱ्यात सौंदाळे गावठाण शाळेचे मुख्याध्यापक रविकांत शिवलकर, सौंदाळे बाऊळवाडी शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत साळुंखे, कसबा वाघाटण शाळेचे मुख्याध्यापक उत्तम मोहिते, वाडा केरपोई शाळेचे मुख्याध्यापक विनायक पाटील, पडेल नरगोल शाळेचे मुख्याध्यापक निवास शिंदे, महेश राठोड, शीतल देवरकर, शुभम चव्हाण, बालाजी देवकाते, राधाकृष्ण नागरगोजे, शेषेराव चव्हाण, संतोष बिडवे, अमित ठाकूर, गिरजप्पा फड, अश्विनी कुंभार, प्राजक्ता शिंदे, नीलम नेमळेकर, कुणाल बुरांडे, सोपान धोटे, नामदेव मुंडे, सुभाष कोकरे, प्रदीप चव्हाण, संध्याराणी झांबरे, पूनम गावित, वैशाली डेरे, अरविंद पाळेकर, जगन बहिरम आदी शिक्षकांचा समावेश होता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.