swt615.jpg
96812
खारेपाटण ः धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांसह कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त
खारेपाटणमध्ये गुणवंतांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, दि. ६ : पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने अशोका विजयादशमी तथा ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. खारेपाटण पंचशीलनगर येथील बुद्ध विहारात स्थानिक मंडळाचे अध्यक्ष भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, भालचंद्र महाराज सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र ब्रम्हदंडे, खारेपाटण केंद्रशाळेचे पदवीधर शिक्षक मिलिंद सरकटे, महिला बचतगट प्रभाग समन्वयक अमोल गराडकर, आरोग्य सेवक संतोष जुवाटकर, बौद्धजन सेवा संघाचे विभाग सचिव सागर पोमेडकर, संघमित्रा महिला मंडळ अध्यक्ष संकिता पाटणकर, सचिव आस्था पाटणकर आदी उपस्थित होते. यावेळी दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संतोष पाटणकर यांच्या वतीने भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
वीणा ब्रम्हदंडे यांनी मरणोत्तर अवयव दान केल्याबाबत त्यांचे पती राजेंद्र व सुपुत्र सचिन ब्रम्हदंडे यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. खारेपाटण केंद्रशाळेचे पदवीधर शिक्षक मिलिंद सरकटे यांनी एमपीएससी स्पर्धा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले. सायंकाळी मुले व महिलांचे विविध फनीगेम घेण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संतोष पाटणकर यांनी केले. आभार सागर पोमेडकर यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.