कोकण

कासार्डे शाळेची ''व्हायसर बॅक्टेरिया'' प्रथम

CD

swt63.jpg
N96817
कासार्डेः राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या कासार्डे विद्यालयाच्या ‘व्हायसर बॅक्टेरिया’ या एकांकिकेला मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

कासार्डे शाळेची ‘व्हायसर बॅक्टेरिया’ प्रथम
विज्ञान महोत्सवात यशः जिल्हास्तरीय नाट्योत्सवासाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ४ : माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे येथे आयोजित केलेल्या कणकवली तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवामध्ये कासार्डे विद्यालयाच्या ‘व्हायसर बॅक्टेरिया’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची कुडाळ येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय नाट्योत्सवासाठी निवड झाली.
या नाट्योत्सवाचे उद्घाटन कासार्डे विकास मंडळाच्या स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी कणकवली गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, शिक्षण विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर, स्पर्धेचे परीक्षक डी. व्ही. पन्हाळकर, एस. एस. पाटील, एस. सी. शेंगाळ, पंचायत समिती कणकवलीचे विषयातज्ज्ञ सचिन तांबे, मुख्याध्यापिका बी. बी. बिसुरे, पर्यवेक्षक एस. व्ही. राणे आदी उपस्थित होते.
हा नाट्यमहोत्सव कासार्डे विद्यालयाच्या सभागृहात पार पडला. यामध्ये तालुक्यातील एकूण चार शाळांनी सहभाग घेतला. यावर्षी मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान असा विषय देण्यात आला होता. हा विज्ञान महोत्सव कोल्हापूर विभाग उपसंचालक कार्यालय, शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग, गटशिक्षणाधिकारी कार्यालय कणकवली आणि कासार्डे विद्यालय यांच्यावतीने आयोजित करण्यात आला.
या महोत्सवात द्वितीय क्रमांक कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली (हरित तंत्रज्ञानाचे महत्त्व), तृतीय क्रमांक माध्यमिक विद्यामंदिर कनेडी (मोबिया : द स्टार्ट ऑफ एंड) यांनी मिळविला. विजेत्या संघांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका बी. बी. बिसुरे यांनी केले. महोत्सव यशस्वी पार पडण्यासाठी विज्ञान प्रमुख एस. एम. जाधव, डी. डी. मिठबावकर, व्ही. व्ही. मुद्राळे, डी. डी. देवरुखकर, डी. एम. पवार, एस. एस. पेडणेकर, पी. वाय. सुतार, एस. एस. वाळके, एस. आर. पांचाळ, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन आर. व्ही. राऊळ यांनी, आभार प्रदर्शन एस. व्ही. राणे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : खासदर शोभाताई बच्छाव यांचा पाचोरा तालुक्यातील पाहणी दौरा पूर्ण

Akola News : आरक्षण जाहीर! कुठे धक्का तर कुठे मिळाली संधी; जिल्ह्यातील पाच नगराध्यक्ष पदांवर महिलाराज

Kannad Nagarparishad Election : कन्नड नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; शहरात ‘भावी वहिनीसाहेब’ ताईसाहेब चर्चेत

SCROLL FOR NEXT