कोकण

गुहागर ः लाडघर किनाऱ्याला ब्लु फ्लॅग पायलटचा दर्जा

CD

rat6p13.jpg-
96834
गुहागर किनारा.
----------
गुहागर, लाडघर किनाऱ्याला ब्लू फ्लॅग पायलटचा दर्जा
पर्यावरण विभाग व पर्यटन संचालनालय; राज्यातील पाच किनारे
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ६ : आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग पायलट दर्जासाठी महाराष्ट्रातील पाच समुद्रकिनाऱ्यांची घोषणा पर्यावरण विभाग व पर्यटन संचालनालय यांनी केली असून, त्यात गुहागर आणि लाडघर या दोन किनाऱ्यांचा सामावेश आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून विकसित होत असलेल्या गुहागरमधील पर्यटनवाढीला मोठा हातभार लागणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील एकही किनारा या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी निवडला गेलेला नव्हता. या वर्षाअखेर मुख्यमंत्री किनाऱ्यांना भेट देणार आहेत.
ब्लू फ्लॅग राष्ट्रीय ज्युरी सदस्य व राष्ट्रीय ऑपरेटर यांनी महाराष्ट्रातील १० समुद्रकिनाऱ्यांची पहाणी केली होती. त्यानंतर झालेल्या मुल्यांकनातून २०२५–२६ या हंगामासाठी ५ किनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग पायलट दर्जा’ प्रदान केला आहे. त्यामध्ये डहाणूमधील पारनाका बीच, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन व नागाव बीच तर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व लाडघर बीच यांचा समावेश आहे. पर्यटनवाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे. गुहागरच्या पर्यटनवाढीसाठी हे महत्वाचे पाऊल ठरणार असून, त्याला पहिल्या टप्प्यामध्ये यश आले आहे. ब्लू फ्लॅग मानांकनासाठी गुहागर नगरपंचायतीकडून प्रस्ताव गेल्यानंतर गुहागर किनाऱ्यावर १२ ते १४ ऑगस्टमध्ये राष्ट्रीय ऑपरेटर व ब्लू फ्लॅग कमिटीने भेट दिली होती. त्या भेटीनंतर केलेल्या मुल्यांकनानुसार ही निवड करण्यात आली आहे. ब्लू फ्लॅग पायलट दर्जा हा वर्षभरात ब्लू फ्लॅग मानांकनासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उभ्या करण्यासाठी देण्यात आला आहे. ६ किलोमीटर विस्तीर्ण असलेल्या गुहागर समुद्रकिनाऱ्यापैकी गुहागर पोलिस परेड मैदानच्या मागील बाजूचा एक किलोमिटरचा समुद्रकिनारा आरक्षित केला आहे. वर्षभरात तिथे सोयीसुविधा उभारणार असल्याचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी सांगितले. गुहागर नगरपंचायतीने ब्लू फ्लॅग पायलट दर्जासाठी आवश्यक सुविधा किनाऱ्यावर सुरू केल्या असून, लवकरच अग्नीशमन वाहनही उपलब्ध होणार आहे. किनाऱ्याला मिळालेल्या दर्जामुळे गुहागर आणि लाडघर दोन्ही ठिकाणांवरील पर्यटनवाढीला चालना मिळणार आहे.
दरम्यान, ब्लू फ्लॅग पायलट दर्जामध्ये वर्षभरात ५ समुद्रकिनाऱ्यांवर सोयीसुविधा उभारायच्या असून, त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व बंदर विभागाकडून गुहागर नगरपंचायतीला जमीन हस्तांतरण करावी लागणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री पर्यावरण विभाग, पर्यटन विभाग यांचा समन्वय कसा राहतो, यावर पुढील यश अवलंबून राहणार आहे.

चौकट
या सुविधा आहेत आवश्यक
ब्लू फ्लॅग पायलट दर्जासाठी समुद्रकिनारी शौचालय, कपडे बदलण्यासाठी खोली, शॉवरपॅनल, जलशुद्धीकरण प्रकल्प, सौरऊर्जा प्रकल्प, शुद्ध पिण्याचे पाणी व्यवस्था, समुद्रकिनाऱ्यावर जाणारा सुसज्ज रस्ता, पथदीप, बसण्यासाठी बाके, समुद्रकिनाऱ्यावर छत्री व आराम खुर्च्या, ओपन जीम, सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक, पार्किंग व्यवस्था, किनाऱ्यावर छोटे छोटे कोकणी उत्पादन विक्रीचे स्टॉल, अग्निशमन वाहन आदी सुविधा उभाराव्या लागणार आहेत. त्यामुळे या सुविधा उभारणीचे गुहागर नगरपंचायतीपुढे आव्हान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : खासदर शोभाताई बच्छाव यांचा पाचोरा तालुक्यातील पाहणी दौरा पूर्ण

Akola News : आरक्षण जाहीर! कुठे धक्का तर कुठे मिळाली संधी; जिल्ह्यातील पाच नगराध्यक्ष पदांवर महिलाराज

Kannad Nagarparishad Election : कन्नड नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; शहरात ‘भावी वहिनीसाहेब’ ताईसाहेब चर्चेत

SCROLL FOR NEXT