कोकण

आशा व मदतनीस पूर्ण मानधनाच्या प्रतीक्षेत

CD

आशा, मदतनीस पूर्ण मानधनाच्या प्रतीक्षेत
महागाईमुळे अडचणी वाढल्या ; अन्य कामे करण्यासाठी होते दमदाटी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः गणेश चतुर्थी, दसरा हे सण झाले असून, दिवाळी जवळ आली आहे. तरीही मागील ६ महिन्यापासून केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने आशा व मदतनिसांना पूर्ण मानधन दिलेले नाही. त्यामुळे महिलांना सण साजरे करणे अशक्य झाले आहे. महागाईमुळे संसार चालवणे कठीण झाले असून, थकीत मानधन द्यावे तसेच आशा व गटप्रवर्तक महिलांना नेमून दिलेल्या कामाशिवाय अन्य कामे करण्यासाठी दमदाटी केली जाते. तसे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे राज्य आशा, गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
आशा महिलांना सतत रेकॉर्ड भरणे, डाटा गोळा करणे, आरोग्यसेवेशी निगडित नसणारी अनावश्यक व अतिरिक्त कामे दिली जातात तसेच आयुष्मान कार्ड व आभा कार्ड काढण्यासाठी मोबाईल आशांना दिलेला नाही. त्या कामाचा मोबदला दिला जात नाही. संपूर्ण आशांचे कामच जमेल तेवढे करण्याचे असूनही राज्यात अनेक प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्ये आशांना दरमहा आयुष्मान कार्ड व आभा कार्ड ५०पेक्षा जास्त काढलीच पाहिजे, असे सांगितले जाते. आशा व गटप्रवर्तक महिला दररोज आठ तासापेक्षाही जास्त तास काम करतात. नोव्हेंबर २०२३ पासून ५ हजार रुपये मानधनवाढ केल्यानंतर आशा महिलांवरील कामाचा ताण वाढवलेला आहे. इतकेच नव्हे, तर सर्वच मानधन कामावर आधारित असून आशा व गटप्रवर्तक महिलांना अक्षरशः गुलामासारखे वागवून घेतले जात आहे. आशा महिलांना विविध ७८ कामांचा दिला जाणारा मोबदला अत्यंत कमी आहे. कामाची सक्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देईपर्यंत दरमहा २६ हजार रुपये व गटप्रवर्तक महिलांना ३० हजार रुपये किमान वेतन मिळावे, अशी मागणी केली आहे; मात्र केंद्र शासनाने ऑक्टोबर २०१८ नंतर आशा महिला गटप्रवर्तकांच्या मानधनात कसलीही वाढ केलेली नाही. तरीही स्वतःला कामात झोकून देऊन आशा व गटप्रवर्तक महिला काम करत आहेत. याबाबत मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना संघटनेच्यावतीने निवेदनेही देण्यात आली आहेत, असे संघटनेचे अध्यक्ष शंकर पुजारी व जनरल सेक्रेटरी सुमन पुजारी यांनी सांगितले.

चौकट
प्रमुख मागण्या
महाराष्ट्र राज्य आशा, गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे २५ विविध मागण्या केल्या आहेत. आयुष्मान व आभा कार्डासाठी मोबाईल, पुरेसा रिचार्ज शासन देत नसल्यामुळे अधिकाऱ्यांनी कामाची सक्ती करू नये, थकीत असलेले राज्य व केंद्र सरकारचे सर्व मानधन तातडीने मिळावे, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, आरोग्य विभागातील रिक्त पदांवर कामाच्या अनुभवाच्या आधारावर कायम शासकीय कर्मचारी म्हणून नेमणूक करावी, आरोग्यवर्धिनी अंतर्गत रिक्त पदांवर नेमणुका कराव्यात, आरोग्यसेविका पदभरतीमध्ये ५० टक्के आरक्षण मिळावे, कामगारविरोधी श्रमसंहिता रद्द करावी, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

सुपरस्टार अभिनेता Vijay Deverakonda च्या कारचा भीषण अपघात! नेमकं काय घडलं? पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला

Georai Nagarparishad Election : बीडमधील गेवराईचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; गीता पवार, शितल दाभाडे दावेदार

Raju Shetty : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटामारी मान्य केली; मग कारवाई का नाही

S.T. Workers: दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा; मशाल मोर्चा निघणार, नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT