कोकण

सावंतवाडी, दोडामार्गातील २६ गावांमध्ये ‘ग्रीन अलर्ट’

CD

सावंतवाडी, दोडामार्गातील २६ गावांमध्ये ‘ग्रीन अलर्ट’

टास्क फोर्स ः वृक्षतोड करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई


सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ७ ः मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरून न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यांतील २६ गावांमध्ये वृक्षतोड बंदी आहे. या भागात वृक्षतोडीचे प्रकार आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन सावंतवाडी दोडामार्ग टॉस्क फोर्स समितीचे सदस्य सचिव वैभव बोराटे यांनी या समितीच्या आढावा बैठकीनंतर केले.
श्री. बोभाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडील २२ एप्रिलला प्रसिद्ध केलेल्या भारत सरकारकडील प्रस्तावित अधिसूचनेमध्ये दोन्ही तालुक्यांतील एकूण २६ गावांचा इको-सेन्सिटिव्ह क्षेत्रात समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडे जनहित याचिका क्र. १९८/२०१४ मध्ये ५ डिसेंबर २०१८ व २२ मार्च २०२४ च्या आदेशान्वये अवैधरित्या होणाऱ्या वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समिती तयार केली आहे. या समितीमध्ये महसूल, वन व पोलिस विभागांमधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. समितीचे अध्यक्ष हे उपविभागीय अधिकारी सावंतवाडी असून सदस्य सचिव सहाय्यक वनसंरक्षक आहेत. तसेच या समितीमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार सावंतवाडी, दोडामार्ग, वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी, आंबोली, दोडामार्ग व पोलिस निरीक्षक सावंतवाडी, दोडामार्ग हे सदस्य आहेत. या समितीच्या मासिक बैठकीमध्ये उच्च न्यायालयाकडील आदेशानुसार वृक्षतोडीस प्रतिबंधित क्षेत्रामध्ये संबंधित विभागांनी वृक्षतोडीस प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने पर्यावरणीय ऱ्हास रोखण्यासाठी केलेली कार्यवाही, प्रचार-प्रसिद्धी व प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा दरमहा आढावा घेतला जातो.
टास्क फोर्स समितीने ठरविल्याप्रमाणे, दोडामार्ग तालुक्यात कोठेही गावात खासगी मालकी शासकीय क्षेत्रात वृक्षतोड झालेली किंवा वृक्षतोड होताना निदर्शनास आल्यास घटनेबाबत जनतेने गावातील पोलिसपाटील, वनरक्षक, तलाठी यापैकी कोणालाही तातडीने कळवावे, जेणेकरून वनविभागाकडील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी जाऊन तत्काळ चौकशी करून आवश्यक कार्यवाही करतील. तसेच अशा चौकशी प्रकरणामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर नागरिकांनी आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अवैध वृक्षतोड झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी यात नमूद केले आहे.
...................
या गावांमध्ये आहे बंदी
सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये समावेश असलेल्या गावांची यादी अशी ः सावंतवाडी तालुका-असनिये, पडवे माजगाव, भालावल, तांबोळी, सरमळे (नेवलीसह), दाभिळ, ओटवणे, कोनशी, घारपी, उडेली, केसरी, फणसवडे. दोडामार्ग तालुका-कुंब्रल, पणतुर्ली, तळकट, झोळंबे, कोलझर, शिरवल, उगाडे, कळणे, भिकेकोनाळ, कुंभवडे, खडपडे, भेकुर्ली, फुकेरी.
...................
...तर इथे दाखल करा तक्रार!
वृक्षतोडीबाबत ऑनलाईन तक्रारीसाठी सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समितीचा sdtfsawantwadi@ gmail.com हा ई-मेल आयडी तयार केला आहे. यावर वृक्षतोडीच्या घटनांबाबत तक्रार दाखल करता येईल. वृक्षतोड तक्रारीसाठी वनविभाग सावंतवाडी यांच्याकडेही तक्रार दाखल करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 world Cup Final नंतर आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद अहमदाबादला! आज झाला मोठा निर्णय

India's Test Downfall: तुला हवं ते सर्व दिलं अन् तू टीम इंडियाचं वाटोळं केलंस! गौतम गंभीरच्या हट्टापाई कसोटीत आपली पिछेहाट...

SMAT 2025: ऋतुराज गायकवाडने मोडले विराट-गिलचे विक्रम, पण महाराष्ट्राचा पहिल्याच सामन्यात पराभव; पृथ्वी शॉही अपयशी

Barshi News : अखेर बार्शीच्या 'त्या' ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा मृत्यू; नोकरीवरुन काढून टाकण्याची दिली होती धमकी

Latest Marathi News Live Update: हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

SCROLL FOR NEXT