कोकण

‘ट्रामा केअर’बाबत दिलेली माहिती खोटी

CD

97087

‘ट्रामा केअर’बाबत दिलेली माहिती खोटी

डॉ. जयेंद्र परुळेकर ः समितीसमोर स्वतंत्र भूमिका मांडू

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ ः येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या एकूणच सुविधेबाबत कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सत्य पडताळणीसाठी नेमलेली समिती उद्या (ता. ८) उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी करणार आहे. जिल्हा आरोग्य विभागाने खंडपीठांसमोर ट्रामा केअरबाबत प्रतिज्ञापत्रातून दिलेली माहिती खोटी असून, त्याची पडताळणी जागरूक नागरिकांमार्फत आम्ही केली. त्यामुळे उद्या येणाऱ्या समितीसमोर आमची स्वतंत्र भूमिका मांडू, असे सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी स्पष्ट केले.
श्री. परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज सावंतवाडी शहरातील जागरूक नागरिकांसह राजकीय नेत्यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये भेट देत तेथील एकूणच आरोग्य विषयक बाबींबाबत पाहणी केली. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ. पांडुरंग वजराटकर व डॉ. गिरिश चौगुले आदींसोबत चर्चा केली. यावेळी विविध विषयांना हात घालत वस्तुस्थिती जाणून घेतली.
यावेळी प्रा. सुभाष गोवेकर, नकुल पार्सेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, राघवेंद्र नार्वेकर, रवी जाधव, रमेश बोंद्रे, प्रसाद पावसकर, पुंडलिक दळवी, नीलिमा गावडे, समीर वंजारी, रूपा मुद्राळे, बाब्या म्हापसेकर, प्रतीक बांदेकर, बावतिस फर्नांडिस यांच्यासह अभिनव फाउंडेशनचे अण्णा म्हापसेकर, जीतू मोरजकर, तुषार विचारे, अतुल केसरकर, राजू केळुसकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी ट्रामा केअर, आयसीयू, ब्लड बँक आदींची पाहणी केली. मात्र, आयसीयूसाठी आवश्यक फिजिशियन एमडीसारखे तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने आयसीयू असूनही नसल्यासारखा आहे. ब्लड बँकेमध्येही तीच परिस्थिती आहे. ट्रामा केअर आवश्यक डॉक्टरांना अपुरे आहे, हे समोर आले आहे. मात्र, असे असतानाही जिल्हा आरोग्य विभागाने कोल्हापूर खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्रातून दिलेली माहिती पूर्णपणे चुकीची आहे. एकूणच अभिनव फाउंडेशनने उपजिल्हा रुग्णालयाच्या वस्तुस्थितीबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे या सर्व प्रकाराला वाचा फुटली. त्यांनी केलेले हे काम कौतुकास्पद असून, उद्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या आदेशानुसार नेमलेली चौकशी समिती उपजिल्हा रुग्णालयाच्या पाहणीसाठी दाखल होणार आहे. यावेळी आमची भूमिका आणि रुग्णालयाची वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडणार आहोत. प्रसंगी वेगळी भूमिका घेऊ, असे डॉ. परुळेकर यांनी स्पष्ट केले.
----
रिक्त पदे न भरल्याने स्थिती
डॉ. ऐवळे यांनी रिक्त असलेल्या पदांबाबत माहिती देत याबाबत वेळोवेळी वरिष्ठ पातळीवर अहवाल सादर केला जातो, असे स्पष्ट केले. या ठिकाणी डॉक्टर यायला बघत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्या स्थितीतही उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करतो. रिक्त पदे भरल्यास डॉक्टरांवर येणारा ताण आणि अन्य गोष्टी आपोआप मार्गी लागणार आहेत. दरम्यान, डॉक्टरांना आवश्यक सुविधा तसेच वेळेत वेतन मिळत नाही, ही वस्तुस्थिती असून, याला सर्वस्वी जबाबदार शासन आहे, असा आरोप परुळेकर यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways Confirm Ticket : रेल्वेकडून प्रवाशांना लवकरच मिळणार Good News! आता ‘कन्फर्म’ तिकिटाची तारीख विनाशुल्क बदलता येणार

Prithvi Shaw : पृथ्वी शॉ पुन्हा वादात अडकला; १८१ धावांच्या खेळीनंतर सर्फराज खानच्या भावाला बॅटने मारायला धावला... VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या समन्वय समितीची बैठक सुरु

गौतम गंभीरच्या राज्यात 'पराभव' हा पर्यायच असू शकत नाही, Varun Chakravarthy चे टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या शैलीवर मोठं भाष्य

Walmik Karad: वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करणारा संदीप तांदळे नेमका कोण? कराडशी काय संबंध?

SCROLL FOR NEXT