कोकण

सावी मुद्राळे ठरली ‘उत्कृष्ट नायिका’

CD

97289

सावी मुद्राळे ठरली ‘उत्कृष्ट नायिका’
तळेरे : जिल्हा परिषद माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी व सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ विषयावर सादर केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान महोत्सवात कासार्डे माध्यमिक विद्यालयाची सहावीतील विद्यार्थिनी सावी मुद्राळे हिला उत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार प्राप्त झाला. सावी हिने यापूर्वी दूरदर्शनवरील ‘ड्रामा ज्युनिअर’मध्येही आपल्या उत्कृष्ट अभिनयाची झलक दाखवत टॉप पाचमध्ये स्थान पटकावले होते. सावीला कुडाळ येथे झालेल्या सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांच्या हस्ते व प्रकाश कानुरकर, सत्यपाल लाडगावकर, संजय शेवाळे, सतीशकुमार कर्ले यांच्या उपस्थितीत गौरविले. विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष मनोज शेलार, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, प्राचार्य बी. बी. बिसुरे, पर्यवेक्षक एस. व्ही. राणे आदींनी अभिनंदन केले.
..................
97290
शेर्पे येथे स्वच्छता मोहिमेस प्रतिसाद
तळेरे : मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायतराज अभियान अंतर्गत शेर्पे गावात ग्रामपंचायतीच्या वतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील सार्वजनिक ठिकाणे व पायवाटा, रस्ते यांची स्वच्छता सरपंच स्मिता पांचाळ यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी उपसरपंच सिराज मुजावर, ग्रामपंचायत सदस्य भूषण शेलार, सायली पांचाळ, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, आशा स्वयंसेविका सरिता शेलार, अंगणवाडी मदतनीस लता पांचाळ, ग्रामस्थ विलास पांचाळ, पप्या कुलकर्णी, गौतम कांबळे, मधुकर शेलार, एकनाथ शेलार, रवींद्र बेळणेकर आदी उपस्थित होते. शेर्पे ग्रामपंचायतीतर्फे राबविलेल्या या मोहिमेत सर्व ग्रामस्थ सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पुणे पोलिसांना लायटर आणि पिस्तूलमधील फरक कळेना? हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा ‘खोटारडेपणा’ उघड

Mumbai: पात्र झोपडीधारकांऐवजी मृतांना घरे वाटली; झोपु योजनेतील बेदायदेशीर सदनिका वाटपाची चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

''शबरीमलातील चोरीची सीबीआय चौकशी करा'' भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांची मागणी

Velhe News : लागोपाठ तीन दिवस राजगडावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; दहा ते पंधरा पर्यटक किरकोळ जखमी

Bhoom News : दबंग खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध भूमचे पोलीस निरीक्षक वाद पेटणार

SCROLL FOR NEXT