कोकण

फाटक हायस्कूलचे सुयश

CD

-rat८p१.jpg-
२५N९७२७२
रत्नागिरी : तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश मिळवणारे फाटक हायस्कूलचे खेळाडू. सोबत मंदार सावंत व बेबीताई पाटील.
-------
मैदानी स्पर्धेत फाटक हायस्कूलचे यश
खेळाडूंची जिल्हास्तरीय निवड ; गोळाफेकमध्ये पारस दुसरा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत फाटक हायस्कूल व श्रीमान वि. स. गांगण आणि (कै.) त्रि. प. केळकर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गोळाफेक, थाळीफेक, उंचउडी, धावणे (रिले) या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय यश संपादन केले. हे खेळाडू आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर या स्पर्धा झाल्या.
चौदा वर्षाखालील गटामध्ये पारस पंडित राठोड (८ वी) याने गोळाफेकमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. २०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात रुद्र प्रसाद पोतदार (८ वी ) याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. धावण्याच्या ४ × १०० मीटर रीले प्रकारात मुलांच्या गटात रुद्र पोतदार, सोहम समीर चव्हाण, श्रेयस सुरेंद्र रेवाळे, वेदांत विनायक सनगरे या खेळाडूंच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.
एकोणीस वर्षाखालील गटामध्ये रितिका संतोष निवेंडकर (११ वी) हिने उंच उडी या क्रीडा प्रकारात उत्तम खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. लांब उडी प्रकारात द्वितीय क्रमांक आणि तिहेरी उडी या प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. अशा तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये तिने उल्लेखनीय यश संपादन केले. त्याचप्रमाणे यश संतोष पालकर (१२ वी) याने गोळाफेकमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. यश धनंजय सरफरे (११ वी) याने थाळीफेकमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला.
तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त खेळाडूंची वालावलकर चॅरिटेबल ट्रस्ट डेरवण येथे १५ व १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा विभाग प्रमुख मंदार सावंत व क्रीडा शिक्षिका बेबीताई पाटील यांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पठारे विरुद्ध पठारे! मार खाणारा तो सचिन पठारे मी नाही...; पुण्यातील राष्ट्रवादीच्या 'त्या' राड्याला अनोखे वळण

AUSW vs PAKW: ७९-७ वरून २२१ धावा! पाकिस्तानने लावलेली वाट, पण ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी-एलना किंग राहिल्या ताठ! वर्ल्ड रेकॉर्डही नावावर

Sridhar Vembu's Zoho success story : कुणाकडून रुपयाचीही मदत न घेता, फक्त मित्र अन् कुटुंबाच्या पाठबळावर उभारली तब्बल 100000 कोटींची कंपनी!

Pune News : विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षेसाठी १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार

Latest Marathi News Live Update : माणुसकीची भिंत २०२५ उपक्रमाची सुरुवात

SCROLL FOR NEXT