- ratchl८१.jpg -
P२५N९७३०१
चिपळूण ः चर्चासत्रात मार्गदर्शन करताना विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई. शेजारी मान्यवर
----
रत्नागिरी होणार पर्यावरणपूरक पर्यटन केंद्र
गिरिजा देसाई ः चिपळुणात वन्यजीव सप्ताहानिमित्त चर्चासत्राचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः कोकणातील निसर्गसंपन्नतेचा विचार करता, येथील जैवविविधता आणि पर्यावरणीय वैभव पर्यटकांना आकर्षित करण्यास पुरेसे सक्षम आहे. अरुणाचल प्रदेशानंतर सर्वाधिक वृक्ष लागवडीखालील क्षेत्र असलेला रत्नागिरी जिल्हा, आता केवळ निसर्गरक्षणापुरता मर्यादित न राहता, पर्यावरणपूरक पर्यटनासाठीही महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे, असे प्रतिपादन विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांनी केले.
वन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वन्यजीव सप्ताहानिमित्त चर्चासत्र येथील वन विभागाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहात झाले. या वेळी वनरक्षक प्रियांका लगड, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे भाऊ काटदरे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, ग्लोबल चिपळूण टुरिझमचे रामशेठ रेडीज यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहानवाज शहा यांनी केले.
गिरिजा देसाई म्हणाल्या, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातही धनेश पक्ष्याच्या आठ प्रजाती आढळतात. हा पक्षी पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण ठरू शकतो. ताडोबामध्ये वाघांसाठी जगभरातून पर्यटक येतात, धनेश पक्ष्याच्या माध्यमातून कोकणातील पक्षी व प्राणी वैभव पाहण्यासाठी देखील जगभरातील अभ्यासक आणि पर्यटक येऊ शकतात. राजापूर व दापोली येथे वन्य प्राण्यांसाठी वन्यजीव उपचार केंद्र (ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर) सुरू होणे गरजेचे आहे. ही सुविधा कार्यान्वित व्हावी, यासाठी वन विभाग पुढाकार घेत आहे. याशिवाय, खेड तालुक्यातील सात्वीण येथे एनआयसी सेंटर उभारण्यात येत असून, येथे अत्याधुनिक पद्धतीने प्राण्यांची माहिती मिळणार आहे. जैतापूर येथे ‘मंगरुज’ या दुर्मिळ प्राण्यासाठी विशेष एनआयसी सेंटर सुरू होणार आहे. तसेच आरे-वारे आणि दापोली-मुरूड येथे इको-टुरिझम प्रकल्प उभारले जाणार आहेत. उन्हाळ्यात पाण्याच्या अभावामुळे पक्षी आणि प्राण्यांचे जीव जातात. सीएसआर निधीच्या माध्यमातून खाजगी जमिनीवरही अभ्यास करून पाणवठे उभारण्याची योजना आखली आहे. वानर त्रासावर उपाय म्हणून हिमाचल प्रदेशहून दोन संशोधकांना बोलावून जीपीएस ट्रॅकिंगच्या साहाय्याने तीन हजार सहाशे वानरांचे पुनर्वसन करण्यात आले असून, यामध्ये एकाही वानराचा मृत्यू झाला नाही, हे विशेष यश आहे.
----
चौकट
निसर्ग संवर्धन उपक्रमात अडचणी
कोकणातील फक्त १.२१ टक्के जमीन वनविभागाच्या अखत्यारित आहे, तर उर्वरित जागा खासगी मालकीची आहे. त्यामुळे निसर्ग संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये अडचणी येतात, असे गिरिजा देसाई यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.