कोकण

दापोलीतील खड्डेमुक्त मोहिमेला स्वखर्चातून हातभार

CD

-rat८p९.jpg-
२५N९७२८१
दापोली ः दापोली-खेड या मुख्य मार्गावरील खड्डे स्वखर्चाने बुजवताना नगरसेवक संदीप चव्हाण.
-----

दापोलीतील खड्डेमुक्त मोहिमेस स्वखर्चातून हातभार
संदीप चव्हाण यांची सामजिक बांधिलकी ; खड्ड्यांमुळे गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ८ : दापोली-खेड या मुख्य मार्गावरील रस्त्यांवर गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन दापोली नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक आणि ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संदीप चव्हाण यांनी स्वतःच्या खर्चातून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे.
बसस्थानक परिसर, बुरोंडीनाका, मासळी मार्केट रोड, काळकाईकोंड आदी भागांमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. नगरपंचायतीत सत्तांतर होऊन जवळपास पाच महिने उलटले असले तरी रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. त्यामुळे निधीची वाट न पाहता चव्हाण यांनी स्वखर्चातून काम करून लोकसेवेचा आदर्श घालून दिला आहे. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. सत्ता असो वा नसो, काम करणारा लोकप्रतिनिधीच खरा सेवक असतो. संदीप चव्हाण यांनी घेतलेला पुढाकार इतरांसाठी प्रेरणादायी आहे, असे येथील नागरिकांमधून कौतुकोद्गार काढले जात आहेत.

कोट
दापोली शहर खड्डेमुक्त करणे हीच माझी प्राथमिकता आहे. प्रशासनाकडून कामात विलंब झाला तरी नागरिकांच्या सोयीसाठी मी हे काम सुरू ठेवणार आहे.
-संदीप चव्हाण, स्वीकृत नगरसेवक, दापोली नगरपंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI BR Gavai यांच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयात १० दलित न्यायाधीशांची नियुक्ती, ओबीसी कीती?

Jalna News: जालना हादरलं! दुचाकी वादातून तरुणाची मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

Dharashiv Accident: धाराशिवमधील अपघातात तिघे ठार; मोटारीचा टायर फुटून अपघात, ११ जण जखमी

Parliament Winter Session 2025 : संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर पासून, सरकार अणू उर्जासह १० मोठी विधेयके मंजूर करण्याच्या तयारीत

आजचे राशिभविष्य - 23 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT