श्रावणी शेलारला
योगासनात रौप्यपदक
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) श्रावणी शेलार हिने मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला योगासन स्पर्धेमध्ये रौप्यपदक पटकावले. नेरूळ येथील स्टर्लिंग आर्टस्, कॉमर्स, सायन्स महाविद्यालयात या स्पर्धा नुकत्याच झाल्या. श्रावणीची (एफवाय बीएसस्सी) निवड मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला योगासन स्पर्धेकरिता कोकण विभाग नं. ४ महिला योगासन संघामध्ये निवड झाली होती. या स्पर्धेत तिने कोकण विभागाचे प्रतिनिधित्व करताना रौप्यपदक पटकावले. तिला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे यांचे मार्गदर्शन तसेच साहाय्यक क्रीडाशिक्षक प्रा. कल्पेश बोटके, वैभव हंजनकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
दिव्यांग विद्यार्थी
शोध शिबिर
साडवली ः विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेतर्फे दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक तपासणी शिबिर देवरुखातील ग्रामीण रुग्णालयात झाले. शिबिरात बौद्धिक अक्षम, अध्ययन अक्षम, अस्थिव्यंग, बहुविकलांग आदी प्रवर्गातील ० ते १८वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आली. शिबिरात एकूण ६० विद्यार्थी उपस्थित होते. ६० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमास मार्गदर्शन सुरेखा पात्रे यांनी करताना विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी व शिक्षकांनी अशा मुलांना योग्य ते सहकार्य करून शासनाच्या योजना समजावून घेऊन शिक्षण दिले पाहिजे. तसेच दिव्यांगातील कोणतेही मूल भविष्यात स्वावलंबी झाले पाहिजे, असे सांगितले.
-rat८p८.jpg-
P२५N९७२८०
दापोली ः जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजयी दळवी हायस्कूलचा संघ व सोबत प्रशिक्षक.
दळवी हायस्कूल व्हॉलीबॉल स्पर्धेत विजेते
दापोली ः जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत यु. ए. दळवी इंग्लिश स्कूलच्या १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने विजेतेपद मिळवले. ही स्पर्धा रत्नागिरी येथे झाली. विजयानंतर या विजयी संघाची निवड सांगली येथे १० ऑक्टोबरला होणाऱ्या विभागस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.