कोकण

आदर, संयमाच्या परंपरेला धक्का

CD

97363

आदर, संयमाच्या परंपरेला धक्का

जिल्हा काँग्रेस ः सरन्यायाधीशांवर हल्ला, कारवाई करा

कणकवली, ता. ८ : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्‍या हल्ल्याचा आज कणकवलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केला. तसेच दोषीवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली. तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना तसे निवेदनही दिले.
काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्यासह नागेश मोरये, विनायक मेस्त्री, अनिल डेगवेकर, मनोहर मोरये, राजेंद्र कदम, विजय सावंत, प्रवीण वरूणकर, प्रदीपकुमार जाधव, उन्मेश राणे, राजेंद्र वर्णे, मितेश मालंडकर आदी उपस्थित होते. तत्‍पूर्वी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून हल्लेखोराचा कार्यकर्त्यांनी निषेध केला.
निवेदनात म्‍हटले आहे की, ‘‘एका वकिलाने हल्ला केल्याची घटना ही लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणारी आहे. भारत हे लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून, संविधानाने सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे अधिकार दिले आहेत. सर्वोच्च न्यायालय हे लोकशाहीचा एक प्रमुख स्तंभ असून न्यायमूर्ती हे देशाचे सर्वोच्च सन्माननीय व्यक्तिमत्त्व आहे. अशा व्यक्तीवर हल्ला करण्याचे कृत्य हे केवळ न्यायव्यवस्थेचा अपमान नाही, तर भारतीय संस्कृतीतील आदर आणि संयमाच्या परंपरेलाही धक्का देणारे आहे. संबंधित व्यक्‍तीवर कठोर कारवाई करावी. ’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : “अब तुम्हारी खैर नहीं”, हसन मुश्रीफांचा कोणाला इशारा; संजय मंडलिकांच्या पॅनेलवर काय म्हणाले...

Pune News : आईची नजर चुकवून खेळायला बाहेर पडले अन् चार तासानंतर मृतदेहच सापडले; पुण्यात सख्ख्या बहीण-भावासोबत नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: : कोल्हापूरमध्ये TET ची प्रश्नपत्रिका फोडणारी टोळी ताब्यात

Pune Airport : पुणे विमानतळावर 'ए-३२१' विमानांची 'भरारी'! प्रवासी क्षमता ४० ने वाढली, एका दिवसातील विक्रमी प्रवासी संख्या ३५ हजारांवर

Viral Video 'नेहा कक्करने टीशर्टवर घातली ब्रा' नेटकरी म्हणाले...'आवरा जरा हिला' व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT