कोकण

सरन्यायाधीशांवरील हल्ला निंदनीय, सखोल चौकशी करा

CD

97381

सरन्यायाधीशांवरील हल्ला
निंदनीय, सखोल चौकशी करा

विवेक विचार मंचाची मागणी

सिंधुदुर्गनगरी, ता. ८ ः सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा विवेक विचार मंच महाराष्ट्रतर्फे निषेध करण्यात आला आहे. हा हल्ला दुर्दैवी, असंविधानिक आणि निंदनीय असून, या प्रकाराने देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेच्या प्रतिष्ठेवर आघात झाला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना याबाबतचे निवेदन दिले. यावेळी मंचाचे संयोजक डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. प्रशांत मोघे, डॉ. सुहास पावसकर, डॉ. गुरू सवादत्ती, किरण जाधव, सुशील कदम, विनोद कदम, किरण जाधव, मारुती वळंजू आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, ‘‘देशातील मतभेद मांडण्यासाठी संविधानिक मार्ग उपलब्ध आहेत. हिंसेचा अवलंब करणे हे असभ्य आणि अमर्याद वर्तन आहे. काही समाजद्रोही व फुटीरतावादी शक्ती घटनेचा राजकीय हेतूंसाठी वापर करून समाजात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी न्यायव्यवस्थेच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chrome Users Warning : 'क्रोम युजर्स'साठी सरकारी एजन्सीने जारी केला गंभीर इशारा!

Eknath Shinde: राजस्थानमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला इशारा, निवडणुकीवरुन दिला 'हा' अल्टिमेटम

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathwada Crime : कडेठाण येथे मुलाने केला पित्याचा खून; प्रेत पुरले घरात; आठ दिवसानंतर घटना उघडकीस!

Theur Crime : पिऊन रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला उचलुन बाजुला करण्याकरीता गेलेल्या दोघांना तिघांनी केली मारहाण!

SCROLL FOR NEXT