कोकण

‘ओंकार’ हत्तीला तातडीने जेरबंद करा

CD

97387

‘ओंकार’ हत्तीला तातडीने जेरबंद करा

संजू परब ः सावंतवाडीत उपवनसंरक्षकांना निवेदन सादर

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ ः ​मडुरा, सातोसे आणि कास या गावांच्या परिसरात ‘ओंकार’ हत्तीने मोठा धुमाकूळ घातला आहे. या हत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, त्याला तातडीने पकडावे, अशी मागणी आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्याकडे केली. यावर वनविभागाने पुढील आठ दिवसांत हत्तीला पकडण्यात यश येईल, अशी ग्वाही दिली.
​गेल्या काही दिवसांपासून ओंकार हत्ती रात्रीच्या वेळी शेतीत शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत. भात कापणी तोंडावर आली असून, हत्तीमुळे ती लांबणीवर गेली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत जिल्हाप्रमुख परब यांनी आज स्थानिक ग्रामस्थांसह वनसंरक्षक शर्मा यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले. ओंकार हत्तीमुळे होणारे नुकसान पाहता त्याला विलंब न लावता त्वरित पकडण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
​या निवेदनाची दखल घेत उपवनसंरक्षक शर्मा यांनी स्पष्ट केले की, वनविभागाने ‘ओंकार’ हत्तीला पकडण्यासाठी विशेष मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. आम्ही पुढील आठ दिवसांत हत्तीला पकडण्यात यश मिळवू, असे आश्वासन त्यांनी श्री. परब आणि उपस्थित ग्रामस्थांना दिले. ​दरम्यान, हत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून, शासनाच्या नियमानुसार उपलब्ध ती मदत त्वरित शेतकऱ्यांना दिली जाईल, असेही शर्मा यांनी सांगितले. ​यावेळी उपसरपंच बाळू गावडे, सोमनाथ परब, दिलीप परब, नारायण परब, ज्ञानेश्वर परब, मनोहर परब, संतोष जाधव, प्रशांत परब, प्रशांत साटेलकर, परीक्षित मांजरेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: "पात्र नसतानाही लाभ घेतला..."; लाडकी बहीण योजनेचा डेटा आयकर विभागाकडे, संपूर्ण हिशोब उघड होणार

Beed Accident: अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीच्या अपघातात कुसुम सुदे यांचे दुर्दैवी निधन

Latest Marathi News Live Update : नागपूरात दिवसाढवळ्या खून प्रकरणात आरोपीची पोलिसांनी काढली धिंड

'अहिल्यानगर जिल्ह्यातील ५०० बिबट्यांचा मुक्काम गुजरातला'; स्थलांतरासाठी मागितली परवानगी, पालकमंत्र्यांनी नेमकं काय केलं?

Palghar News: इथे ओशाळली माणुसकी! रुग्णवाहिकेनं वाटेतच सोडलं, बाळासह महिला...; धक्कादायक घटना समोर

SCROLL FOR NEXT