कोकण

कुचकामी आपत्ती व्यवस्थापनावर आवाज उठवणार

CD

swt93.jpg
97530
कुडाळः शिरोडा-वेळागर येथील समुद्रात मृत पावलेल्या पिंगुळी येथील युवकांच्या कुटुंबियांची माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट घेत सांत्वन केले.

कुचकामी आपत्ती व्यवस्थापनावर आवाज उठवणार
वैभव नाईकः पिंगुळीतील मणियार कुटुंबियांचे सांत्वन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ः शिरोडा येथील समुद्रात बुडालेल्यांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून तातडीची सेवा मिळालच नाही, अशी कैफियत पिंगुळी येथील मणियार कुटुंबियांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडे मांडली. याबाबत आपत्ती काळात प्रशासनाच्या कुचकामी ठरत असलेल्या यंत्रणेवर निश्चितच आवाज उठवू, असे श्री. नाईक यांनी सांगून मणियार कुटुंबियांचे सांत्वन केले.
शिरोडा-वेळागर येथील समुद्रात मृत पावलेल्या पिंगुळी येथील युवकांच्या कुटुंबियांची माजी आमदार नाईक यांनी भेट घेत सांत्वन केले. यावेळी मणियार कुटुंबियांनी नाईक यांच्याकडे आपली कैफियत मांडली. शिरोडा-वेळागर येथे समुद्रावर हजारोंच्या संख्येने पर्यटक येत आहेत; मात्र पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा यंत्रणा तैनात नाही अथवा सूचना फलक लावलेले नाहीत. धोकादायक ठिकाण म्हणून घोषित केलेले नाही. त्याचबरोबर आमच्या कुटुंबातील ८ जण बुडाले असता त्यांचे मृतदेह काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आली; परंतु त्यांच्याकडे बोट उपलब्ध नसल्याने एकाच वेळी सर्व मृतदेह सापडले नाहीत. बेळगाव येथे मृतदेह नेण्यासाठी शासनाची रुग्णवाहिका देखील उपलब्ध झाली नाही. त्यामुळे खासगी रुग्णवाहिकेला पाचारण करावे लागले. जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार असे सर्व अधिकारी आले, परंतु तातडीची सेवा मिळाली नाही. या घटनेसाठी आम्ही कोणाला जबाबदार धरत नाही, परंतु अशी वेळ अन्य कोणावर येऊ नये, यासाठी आपल्या पर्यटन जिल्ह्यातील सुरक्षा विषयक सर्व यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कायम तैनात असाव्यात, पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी प्रशासनाकडून घेतली जावी, अशी भूमिका मणियार कुटुंबियांनी मांडली.
दरम्यान, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणार. आपत्ती काळात प्रशासनाच्या कुचकामी ठरत असलेल्या यंत्रणेवर आवाज उठविणार असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, पिंगुळी विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, उपविभाग प्रमुख सचिन ठाकूर, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, अमित राणे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Decision: कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय! महिलांना मिळणार मासिक पाळी रजा, सर्व क्षेत्रातील महिलांसाठी लागू

Varinder Singh Ghuman death : धक्कादायक! जगातील पहिला शाकाहारी ‘प्रोफेशनल बॉडीबिल्डर‘ वरिंदर सिंह घुमनचा ‘हार्ट अटॅक’ने मृत्यू

ऑक्टोबरअखेर ‘मिनी मंत्रालया’चा बिगुल! आज पंचायत समिती सभातपींचे तर सोमवारी गट-गणांचे निघणार आरक्षण; शिक्षकांना जानेवारीपर्यंत इलेक्शन ड्यूटी

Pune Crime : गुंड नीलेश घायवळसह सचिन घायवळवर गुन्हा दाखल; कोथरूडमधील तब्बल १० सदनिका बळकावल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT