swt94.jpg
97531
आंबोली ः सैनिक स्कूल येथे पी. एफ. डान्टस यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना सुनील राऊळ व इतर मान्यवर.
आंबोलीत हवाई दलाच्या सेवेला सलाम
सैनिक स्कूलचे आयोजन; डान्टस यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः आंबोली येथील सैनिक स्कूलमध्ये यावेळी ९३ वा ‘हवाई दल दिन’ साजरा करण्यात आला. यानिमित्त सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या हवाई दलातील विविध प्रतिकृतींचे उपस्थितांनी कौतुक केले. यावेळी सहकाररत्न (कै.) पी. एफ. डॉन्टस यांना द्वितीय स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
डॉन्टस यांनी सहकार, शिक्षण, राजकारण, समाजकारण अशा सर्वच क्षेत्रांत प्रभावशाली कार्य केले. त्यांनी स्थापन केलेल्या आजी-माजी सैनिकांची संघटना, सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली, सैनिक पतसंस्था, कॅथोलिक बँक, राज्य सरकारी कर्मचारी संघटना या सर्वच संस्था समर्थपणे त्यांच्या कार्याचा स्मृतिगंध सर्वत्र पसरवत आहेत, असे मान्यवरांनी सांगितले.
प्रास्ताविक एस. एन. पोतदार यांनी केले. विद्यार्थी अथर्व पालव याने डान्टस आणि सैनिक स्कूल हे अमृततुल्य मिश्रण होते, असे सांगितले. डॉन्टस यांचे पुत्र आणि सैनिक स्कूलचे सचिव जॉय डान्टस यांनी, डान्टस यांनी पाहिलेली स्वप्ने साकार करणे, हे आपले सर्वांचे कर्तव्य असल्याचे सांगितले. संस्थाध्यक्ष सुनील राऊळ यांनी, डान्टस यांच्या स्वप्नांना, विचारांना अजून भव्यदिव्य करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी सैनिक बँक चेअरमन बाबूराव कविटकर, माजी प्राचार्य एस. टी. गावडे, ‘आयईसएल’चे माजी अध्यक्ष सुभेदार शशिकांत गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ संचालक शिवाजी परब, सुभेदार शशिकांत गावडे, सैनिक पतसंस्था उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद तावडे, माजी प्राचार्य एस. टी. गावडे, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, प्राचार्य एन. डी. गावडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
हवाई दल दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिकृती बनवून भारतीय हवाई दलाबद्दल माहिती करून दिली. यामध्ये बी २ बॉम्बर, राफेल, सुखोई ३० एमकेआय, सुखोई ५७, एम.आय.जी. २१, एम.आय.जी. २९, स्पेसकॅट जग्वार अशा विविध प्रतिकृती बनवल्या आणि त्यांची माहिती दिली. यामध्ये प्रज्वल यादव, वेदांत वातकर, हर्ष वळंजू, अर्णव कासार, दुर्वेश कोटनाके, सर्वेश गावडे, जयेश धुरी, सिद्धांत देसाई, रुद्र बर्वे, अथर्व राठोड, अमेय पवार, अरमान कादिरी, दत्ताराम शेलार यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य एन.डी. गावडे यांनी केले, तर सूत्रसंचालन हंबीरराव आडकूरकर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.