कोकण

नाग्या महादू वसतिगृहास मदत

CD

97535

नाग्या महादू वसतिगृहास मदत
कुडाळ, ता. ९ ः वेताळबांबर्डे कदमवाडी (ता.कुडाळ) येथील शोषित व पीडित मुलांकरिता चालविण्यात येणाऱ्या नाग्या महादू निवासी वसतिगृहास मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई या संस्थांमार्फत कपाट, इलेक्ट्रिक शेगडी, नेब्युलायझर, पाणी गरम करायची कीटली, स्वयंपाकघरास लागणारी विविध प्रकारची भांडी, मुलांसाठी कपडे अशा विविध वस्तू देण्याचा कार्यक्रम कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. यावेळी वसतिगृहातील मुलांनी प्रार्थना व समूह गायन करून पाहुण्यांचे स्वागत केले. चौधरी ट्रस्टच्या सहकार्याने अमोल नारिंग्रेकर यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ गोदरेज कपाट दिले. यावेळी तहसीलदार वसावे यांनी, विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रांत प्रावीण्य मिळवून जिल्ह्याचा देशात नावलौकिक करावा, असे आवाहन केले. भविष्यात उद्भभवणाऱ्या शासकीय अडचणी दूर करण्याची हमी त्यांनी दिली. संस्थाचालक चौधरी यांनी, भविष्यातही अशा प्रकारे मदतीचा ओघ संस्थेसाठी सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. ट्रस्टचे सचिव संदीप साळसकर यांनी शैक्षणिक दृष्ट्या कशी प्रगती करावी, याबाबत मुलांना मार्गदर्शन केले. उदय आईर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar News: इथे ओशाळली माणुसकी! रुग्णवाहिकेनं वाटेतच सोडलं, बाळासह महिला...; धक्कादायक घटना समोर

Latest Marathi News Live Update : कफ परेड येथे मेट्रो सेवा ठप्प

'यमला पगला दीवाना हे शीर्षक मी सुचवलेलं' सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा, म्हणाले...'धरमजींचा फोन आला...'

Gold Rate Today: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही सोने कोसळले मात्र चांदी झाली महाग; जाणून घ्या आजचा ताजा भाव

Amravati News : अमरावती महापालिकेच्या प्रारूप मतदारयादीत घोळच घोळ; भाजप खासदारासह जिल्हाध्यक्षांचाही आक्षेप, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT