कोकण

आली दिवाळी

CD

लोगो........ आली दिवाळी


-rat९p१०.jpg-
P२५N९७५००
रत्नागिरी : आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळेत पणत्या रंगवण्याचे काम करताना विद्यार्थी.
-rat९p११.jpg-
P२५N९७५०१
रत्नागिरी : तयार केलेले आकर्षक कंदील दाखवताना कार्यशाळेचे विद्यार्थी.
-----
भिडे कार्यशाळेच्या विद्यार्थ्यांचा ‘कलाविष्कार’
आकर्षक पणत्या, मेणबत्त्या, आकाशकंदिलांची निर्मिती ; स्वयंरोजगाराला प्रोत्साहन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळेत प्रौढ दिव्यांगांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करून समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणले जात आहे. दिवाळीची चाहूल लागताच कार्यशाळेत पणत्या, आकाशकंदील अशा अनेकविध हस्तकलेच्या वस्तू साकारल्या जात आहेत. या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या वस्तू सर्वांनाच हव्याहव्याशा वाटतात. या वस्तू निर्मितीतून या विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही वाव मिळतोय.
गेल्या ३३ वर्षांपासून कार्यशाळा सुरू असून, आजवर ४४ विद्यार्थ्यांचे व्यावसायिक पुनर्वसन करण्यात कार्यशाळेला यश आले आहे. ते आपल्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हातभार लावत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना शासकीय मदत मिळवून देऊन त्यांना देखील स्वयंरोजगाराकरिता प्रोत्साहित केले जात आहे. कार्यशाळा आणि मीरा लिमये उत्पादन केंद्रामध्ये व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये खास दीपावलीकरिता लागणाऱ्या वस्तू मोठ्या प्रमाणावर तयार करून त्यांची विक्री करण्यात येते.
कार्यशाळेमध्ये सध्या विविध प्रकारची हस्तकला, स्टेशनरी मेकिंग, शिवण, गृहशास्त्र, व्हाईट क्लीनर, अगरबत्ती मेकिंग, मेणबत्ती, ज्वेलरी असे विभाग कार्यरत आहेत. गेली १९ वर्षे विद्यार्थी स्टॉलच्या माध्यमातून कलादालनाच्या माध्यमातून स्वतः निर्माण केलेल्या वस्तू विक्री करत आहेत. यामध्ये पालकांचादेखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग असतो. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या व्यावसायिक प्रशिक्षणातून निर्माण होणाऱ्या वस्तूंची विक्री करून मिळणारा नफा विद्यार्थ्यांना विभागून दिला जातो. आविष्कार संस्थेच्या माध्यमातून सविता कामत विद्यामंदिर, शामराव भिडे कार्यशाळा, वर्षा चोक्सी बाल मार्गदर्शन केंद्र, (कै.) प्रताप मंगेश कानविंदे शीघ्र उपचार केंद्र, मीरा लिमये उत्पादन केंद्र असे उपक्रम कार्यरत आहेत.
---
चौकट १
१४ पासून प्रदर्शन
आविष्कारचे विक्री केंद्र स्वा. सावरकर नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारापाशी सुरू राहील. या केंद्राचे उद्‍घाटन १४ला सायंकाळी ४ वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे करणार असून, या वेळी उद्योजक विनय देसाई प्रमुख उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शन १७ ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी ४ ते रात्री ९ पर्यंत खुले राहील. प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष बिपिन शहा, सचिव प्रा. डॉ. सोनाली कदम, कार्यशाळा समिती अध्यक्ष सिद्धेश वैद्य आणि व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनी केले आहे.
----------
कोट
स्वतः जगणं सोप आहे; परंतु स्वतः जगता जगता इतरांना जगणं शिकवण आणि त्यांना घडवणं हे फारच कठीण काम आहे. हे कार्य आविष्कार संस्था मतिमंदांच्या विकासासाठी गेली ३९ वर्षे करत आहे. विद्यार्थी विक्रीकेंद्राच्या माध्यमातून स्वतः निर्मिती केलेल्या वस्तू विक्री करतात. त्यामुळे विद्यार्थी प्रोत्साहित होऊन त्यांची पुढील कौशल्य विकसित व्हायला मदत होते.
- बिपिन शहा, अध्यक्ष, आविष्कार संस्था.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताचा पहिला पराभव, अव्वल क्रमांकाची संधी हुकली! वोल्वार्ड्ट - डी क्लार्कच्या आक्रमणाने द. आफ्रिकेचा विजय

Maharashtra Ranji Squad: पृथ्वी शॉची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड; कर्णधारपदाची ऋतुराज नाही, तर 'या' खेळाडूकडे जबाबदारी

PM Modi Congratulates Trump : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींकडून ट्रम्प यांचे अभिनंदन अन् ट्रेड डीलवरही झाली चर्चा

Mumbai Metro: पहिल्याच दिवशी ‘मेट्रो ३’मधून लाखो प्रवाशांचा प्रवास, पण समस्यांचा पाढा वाचला, वाचा सविस्तर...

INDW vs SAW: पोरीनं काय भारी कॅच घेतलाय! भारताच्या क्रांतीने पकडला वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम झेल; पाहा Video

SCROLL FOR NEXT