कोकण

-शेतकरी, महिलांसाठी शिवसेनेची चिपळुणात निदर्शने

CD

-rat९p४.jpg-
२५N९७४८९
चिपळूण : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तहसीलदार यांना निवेदन देताना शिवसेनेचे पदाधिकारी.
-----------
चिपळुणात ठाकरेसेनेची निदर्शने
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान; मदत देण्यात चालढकल
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ : शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय मागण्यांसाठी ठाकरे शिवसेनेने बुधवारी (ता. ८) तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शन करून निवेदन सादर केले.
अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी ५० हजार रुपये थेट आर्थिक मदत जाहीर करावी, नैसर्गिक आपत्तीपूर्व नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. याचे नेतृत्व ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख बळीराम गुजर यांनी केले. राज्यातील गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे आणि पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. सरकारकडून योग्य मदत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे. त्यामुळे शिवसेनेने राज्य सरकारकडे तातडीने अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी ५० हजार थेट आर्थिक मदत जाहीर करावी आणि नैसर्गिक आपत्तीपूर्व नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, या मागण्या मान्य करण्याची मागणी केली आहे.
पीकविमा योजना सुलभ करून विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. अतिवृष्टीमुळे घरे आणि पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना पुरेसा मोबदला द्यावा. जनतेसाठी बंद करण्यात आलेला ‘आनंदाचा शिधा’ तातडीने सुरू करावा. राज्यातील महिलांना दिलेल्या वचनाप्रमाणे २१००ची आर्थिक मदत त्यांच्या खात्यात जमा करावी. ही मागणीपत्रे शिवसेनेच्यावतीने तहसीलदार प्रवीण लोकरे यांना देण्यात आली. त्यांनी सर्व मागण्या ऐकून घेतल्या आणि शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले तसेच, चिपळूण तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल तातडीने शासनाकडे पाठवण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. निदर्शनाप्रसंगी तालुका समन्वयक सुधीर शिंदे, तालुका संपर्क संघटक अशोकराव नलावडे, उपजिल्हा संघटिका धनश्री शिंदे आणि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train AI Fake Tickets : मुंबई लोकल ट्रेनसाठी ‘AI’द्वारे बनावट तिकिटे तयार करणाऱ्यांना होवू शकते पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Crime: डोळे काढले, शरीरावर १५० जखमा अन्...; १४ वर्षीय प्रेयसीसोबत भयंकर कृत्य, ४८ वर्षीय प्रियकराने क्रूरतेच्या मर्यादा ओलांडल्या

IND vs SA: 'ऋतुराजला एका अपयशामुळे टीम इंडियातून काढू नका, मी हात जोडले...', माजी क्रिकेटरची विनंती

Army Jawan : देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानाचा यथोचित सन्मान; सैनिकाच्या 'त्या' कृतीने जिंकली मने, असं काय केलं?

PMC Hoarding Fee : होर्डिंग शुल्क दरवाढीचा ठराव शासनाकडून रद्द; महापालिकेला मोठा झटका!

SCROLL FOR NEXT