कोकण

दाखले वाटपात ''सावंतवाडी महसूल'' अव्वल

CD

swt922.jpg
97606
श्रीधर पाटील

दाखले वाटपात ''सावंतवाडी महसूल'' अव्वल
श्रीधर पाटील ः १०, ११२ वय, अधिवास दाखल्यांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून ''सेवा पंधरवडा'' अंतर्गत ''शाळा तिथे दाखले'' या अभियान अंतर्गत पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वय, अधिवास दाखले शाळेमध्येच देण्याचे नियोजन केले होते. यात ९९.५१ टक्के पूर्तता करत १०, ११२ वय, अधिवास दाखल्यांचे वाटप करत सावंतवाडी महसूल विभाग जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.
याबाबत बोलताना तहसीलदार श्रीधर पाटील म्हणाले, "जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मांडलेल्या या संकल्पनेत आम्ही चांगली कामगिरी करू शकलो. अशक्यप्राय वाटणारी गोष्ट सर्वांच्या सहकार्याने पूर्ण झाली. जातीचे दाखले देण्याच काम सुरू असून ते लवकरात लवकर संपविण्याचे उद्दीष्ट आहे. १० हजार ११२ इतके वय, अधिवास दाखले आम्ही वितरित केले आहेत. या अभियानासाठी सर्व अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी तसेच सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि सर्वात महत्वाचे सर्व सीएससी आणि महा ई सेवा केंद्र चालक आणि सर्व शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहकार्य केले."
जात प्रमाणपत्रांचे १ हजार ३८६ दाखले वाटप करण्यात आले आहेत. या कामात श्रीमती तारी, श्रीमती गावडे, श्री. निपाणीकर, श्रीमती चव्हाण, श्रीमती पवार, स्वप्नील प्रभू, पंकज किनळेकर, महेश लटपटे, केतन कांबळे, दीपिका राठोड आणि कोमल काकडे यांचे विशेष सहकार्य लाभले. सर्व सीएससी सेंटर आणि महा ई सेवा केंद्र चालक या सर्वांनी रात्री उशिरा, सुट्टीच्या दिवशी देखील काम केले. त्यामुळे त्यांचे विशेष अभिनंदन असेही तहसीलदार पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA , 2nd Test: जैस्वाल लढला, पण सुदर्शन, जुरेल, पंत मात्र फेल; भारताचा अर्धा संघ तंबूत, फॉलोऑन टाळण्याचं आव्हान

Kolhapur : आमचं गाव नाही का, विमानानं जाणारीच माणसं आहेत काय? रस्त्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक, विमानतळावर आंदोलन

Latest Marathi News Live Update : पालघरच्या परनाळी परिसरात दोन गटांत तुंबळ हाणामारी

Chhatrapati Sambhajinagar: प्रेमात पडलेल्या मुलीकडून घरात चोरी! ११ लाख पळवल्यावर आई वडिलांनी केलेलं माफ; पुन्हा दागिन्यांवर डल्ला

Sinhagad Fort: खासदार नीलेश लंकेंचा पुढाकार! सिंहगडावर ‘आपला मावळा’कडून स्वच्छता; शेकडो शिवभक्तांचा सहभाग..

SCROLL FOR NEXT