-rat११p७.jpg-
२५N९७९३४
सिद्धार्थ भोवड
-rat११p८.jpg-
२५N९७९३५
सिद्धार्थ भोवड याचे चित्र.
-rat११p९.jpg-
P२५N९७९३६
सौरभ साठे
-rat११p१०.jpg-
२५N९७९३२
सौरभ साठेचे अप्रतिम चित्र.
-----
‘सावर्डे कला’चे राष्ट्रीय पातळीवर यश
सौरभ साठेला सुवर्णपदक; सिद्धार्थ भोवडला रोख पारितोषिक
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ११ ः उज्जैन (मध्यप्रदेश) येथील कलावर्तन्यासतर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील चित्रस्पर्धेत देशभरातील विविध राज्यांतून स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. यामध्ये सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्राचा झेंडा उंचावला. स्पर्धेत सौरभ साठे याला उत्कृष्ट कलाकृतीसाठी सुवर्णपदक प्रदान करण्यात आले, तर सिद्धार्थ भोवड यास प्रभावी सर्जनशीलतेबद्दल रोख रकमेचे पारितोषिक मिळाले.
सावर्डे येथील सह्याद्री कला महाविद्यालय दरवर्षी विविध राज्य आणि राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत भाग घेत असते. दरवर्षी या कला महाविद्यालयातील विद्यार्थी अशा स्पर्धांमधून उल्लेखनीय यश मिळवत असतात. याबरोबरच राज्य कलाप्रदर्शन, बॉम्बे आर्ट सोसायटी कला प्रदर्शन अशा प्रदर्शनांमधून विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची निवड होत असते. विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण सराव, कलाकृती साकारताना त्यांना दिले जाणारे स्वातंत्र्य, कला विद्यार्थ्यांची स्वतःची स्वतंत्र कलाशैली यामुळेच आमच्या कला महाविद्यालयातील विद्यार्थी स्वतःची स्वतंत्र ओळख प्राप्त करून असल्याचे कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव यांनी सांगितले.
------
कोट
स्पर्धेत पारितोषिक मिळावे या दृष्टीने आम्ही काम केले होते असे नव्हे, तर आमच्या हातून साकारणारे प्रत्येक काम हे दर्जेदारच असावे असे आमचे प्रयत्न असल्यानेच आम्हाला या स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळाले.
--सौरभ साठे, सिद्धार्थ भोवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.