कोकण

सैनिक सहकारी पतसंस्थेतर्फे ‘युवा स्वावलंबी कर्ज योजना’

CD

97964

सैनिक सहकारी पतसंस्थेतर्फे
‘युवा स्वावलंबी कर्ज योजना’

सावंतवाडी, ता. ११ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराच्या संधींचे प्रमाण अत्यल्प आहे. त्याला थोडाफार हातभार लावण्याच्या उद्देशाने सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे युवा स्वावलंबी कर्ज योजना (उद्योजकता अभियान) सुरू करण्याचा निर्णय नुकताच संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष बाबूराव कविटकर व मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यातील अनेक युवक व युवती स्वतःचा उद्योग, व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असतात. मात्र, आर्थिक भांडवलाअभावी त्यांना ते शक्य होत नाही. त्यामुळे पतसंस्थेने २१ ते ३५ वयोगटातील नव्याने उद्योग, व्यवसाय उभारण्याची इच्छा असलेल्यांसाठी ‘युवा स्वावलंबी कर्ज योजना’ सुरू केली आहे. त्याचा प्रारंभ करण्यात आला. एकूण प्रकल्प अहवालाच्या ७० टक्के रक्कम पतसंस्थेतर्फे कर्जाऊ स्वरूपात दिले जातील व ३० टक्के रक्कम स्वयंगुंतवणूक असेल. ही योजना १ नोव्हेंबरपासून संस्थेच्या सर्व शाखांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. जे युवक-युवती नव्याने रोजगार सुरू करू इच्छितात, त्यांनी नजीकच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच सध्या ज्यांचे उद्योग, व्यवसाय सुरू आहेत, अशा महिलांसाठी ‘वीरांगना महिला कर्ज योजना’ सुरू केली आहे. यात पगार तारण, व्यवसाय तारण, पिग्मी तारण, पेन्शन तारण अशा विविध प्रकारांत महिलांना पाच लाखांपर्यंतचे कर्ज कागदपत्रांच्या पूर्ततेअंती जलद दिले जाणार आहे. युवा स्वावलंबी कर्ज योजनेंर्तगत सात लाखांपर्यंतचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती दिली. संस्थेचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत शिरसाट, संचालक दीनानाथ सावंत, सुभाष सावंत, भिवा गावडे, चंद्रशेखर जोशी, शांताराम पवार, शिदू वरक, श्यामसुंदर सावंत, संतोष मुसळे, गोपाळ बाईत यांनी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सत्तेसाठी एकत्र… आता एकमेकांचे शत्रू? महायुतीत कोण कुणाला पाडणार? महाराष्ट्रात पुन्हा होणार सत्तासंघर्ष, निवडणुकीनंतर काय घडणार?

Latest Marathi News Live Update : व्हाईट हाऊसजवळील गोळीबारावर काय म्हणाले

iPhone 17 Discount : TATA अर्ध्या किंमतीत विकत आहे iPhone 17! इथे लपलीये स्पेशल डील; पटकन करा बूकिंग, फक्त तीन दिवस बाकी

UP मधील बीएलओंना ‘डबल फायदा’! मानधन वाढीसोबतच SIRसाठी 2000 रुपयांपासून सुरू होणारा विशेष भत्ता

Video : मल्लिका काकूने गुंडांकरवी केला स्वानंदीच्या वडिलांवर हल्ला ; प्रोमो पाहून प्रेक्षक चिडले

SCROLL FOR NEXT