कोकण

महामार्गावर सावलीच्या शोधात

CD

rat१२p५.jpg
९८०६६
मिऱ्या-नागपूर महामार्गावर हातखंबा येथे प्रवासी शेडअभावी होत असलेली गैरसोय.
rat१२p६.jpg-
N९८०६७
राजापूर येथे महामार्गावर उभारलेली पिकअपशेड.
rat१२p८.jpg-
९८०६९
महामार्गावरील खेड रेल्वे स्थानकानजीक उन्हात एस.टी. बस ची वाट पाहणारे प्रवासी.
rat१२p९.jpg
९८०७०
खेड ः परशुराम या ठिकाणी गळक्या अवस्थेत असलेली महामार्गावरच्या सव्हिर्स रोड वरील निवारा शेड.
rat१२p१०.jpg-
९८०६१
महामार्गावर लोटे तलारी फाटा येथील प्रवासी निवारा शेड. ही शेड जोडरस्त्यावर असल्याने प्रवाशांकडून वापर होत नाही.
----------
सकाळ विशेष--------लोगो

इंट्रो

मुंबई - गोवा आणि मिऱ्या - कोल्हापूर या दोन महामार्गावरील चौपदरीकरण वेगाने सुरू आहे. त्यातील मुंबई - गोवा महामार्गावर खेड, चिपळूण तालुक्यातील बहुतेक काम पूर्ण झाले असून आरवली (संगमेश्वर) ते वाकेड (लांजा) पर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी अजूनही गती देणे गरजेचे आहे. या मार्गावर ठिकठिकाणी छोटी - छोटी गावे वसलेली आहेत. तेथील ग्रामस्थ प्रवासासाठी मुख्य मार्गावर येतात. त्यांना निवारा शेडअभावी कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी काम पूर्ण होऊनही शेड उभारलेले नाहीत, तर काही ठिकाणी शेडच मंजूर झालेल्या नाहीत. त्यामुळे आता पावसाळा सरल्यावर पुढील सहा महिने प्रवाशांना उन्हाच्या झळांचा सामना करत महामार्गावर तिष्ठत राहावे लागणार आहे. चौपदरीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडेही तोडून टाकल्यामुळे ती सावलीही हरवली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या दोन्ही महामार्गावरील प्रवाशांसाठी हा प्रश्न त्रासदायक ठरणारा आहे....!

– राजेंद्र बाईत, नागेश पाटील, सिद्धेश परशेट्ये
---

महामार्गावर सावलीच्या शोधात…!

निवारा शेडचा प्रश्न; चौपदरीकरणाला विलंब, आता उन्हाच्या झळा

चौपदरीकरणासाठी महामार्गावरील भली मोठी झाडे तोडली आहेत. तसेच अनेक ठिकाणच्या प्रवासी निवारा शेडही तोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे हा मार्ग भकास झाला आहे. निसर्गाचा आनंद घेत जाणाऱ्या या मार्गावरील चौपदरीकरणानंतरचा प्रवास कंटाळवाणा आणि तितकाच त्रासदायकही होत आहे. महामार्गावरून प्रवास करताना सावलीचा प्रश्नही तितकाच गंभीर बनत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने जुन्या बसथांब्यांच्या ठिकाणी पावसाळ्यात तात्पुरत्या शेड उभ्या करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता त्याही गायब झाल्या आहेत. एकीकडे सावली देणारे भलेमोठे वृक्ष तोडले गेले असून, दुसरीकडे काही ठिकाणच्या निवारा शेडही गायब आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण तालुक्यातील बहुतेक काम पूर्ण झाले आहे.

आरवलीपासून पुढे वाकेडपर्यंतच्या कामाला विलंब झाला आहे. महामार्गासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेले मोठमोठे वृक्ष चौपदरीकरणासाठी तोडण्यात आले आहेत. त्याचबरोबर रस्त्याचे अंतर वाढल्यामुळे प्रवाशांसाठीच्या निवारा शेडही तोडण्यात आलेल्या आहेत. काम पूर्ण होईल, तशा निवारा शेड उभारण्यात येत आहेत. काही ठिकाणी जागेअभावी शेड उभारणीत अडथळा येत आहे. आरवली ते वाकेड दरम्यानच्या सर्वच पिकअप शेड अजून उभारलेल्या नाहीत. काम सुरू झाल्यानंतर या परिस्थितीचा प्रवासी सामना करीत पुढे जात आहेत. मोठी गावे आणि जिथे प्रवाशांची नेहमीच गर्दी होते, त्या ठिकाणी निवारा शेड उभारण्याची अत्यंत गरज आहे. त्याकडे अजूनही दुर्लक्षच झाले आहे. पिकअप शेड उभारणी करताना त्याचा फारसा विचार झालेला नाही. हीच परिस्थिती मिऱ्या-कोल्हापूर महामार्गावर सर्वाधिक पहायला मिळत आहे.


दृष्टीक्षेपात समस्या

* महामार्गावर खेड तालुक्यात खवटी ते परशुराम घाट इथपर्यंत अनेक ठिकाणी प्रवासी निवारा शेड उभ्या केलेल्या असल्या, तरीही त्या निवारा शेड केवळ शोभेच्या बनलेल्या आहेत. निवारा शेडचा प्रवाशांना फारसा फायदा होत नाही. त्यांचा मोकाट गुरांनी ताबा घेतलेला दिसतो. तर ज्या ठिकाणी बसथांबाच दिलेला नाही, अशा ठिकाणी ठेकेदाराने प्रवासी निवारा शेड उभी केलेली दिसून येते. प्रवासी निवारा शेड केवळ उभ्या केल्या आहेत; त्याठिकाणी गवत उगवलेले दिसून येते, तर छप्परही गळकी आहेत. तसेच जिथे खरी गरज आहे, त्या भरणे नाका परिसरात प्रवासी निवारा शेडच नाही. त्यामुळे महामार्गावरून एसटी व अन्य तत्सम वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उन्हाचा आणि पावसाचा मारा सहन करावा लागत आहे.

* संगमेश्वर टप्प्यात आरवली-बावनदी या टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी विलंब झालेला आहे. या मार्गावर धामणी, तुरळ, आरवली, राजवाडी, गोळवली, आंबेड यासह अजूनही तुरळ येथे १५ हून अधिक छोटे-मोठे थांबे आहेत. तिथे प्रवाशांची गैरसोय होत आहे. उन्हा-पावसात बसची प्रतीक्षा करत लोकांना थांबावे लागते. तुरळ येथे प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असते. अशा ठिकाणी तात्पुरती व्यवस्था करणे आवश्यक होते, परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

* रत्नागिरीत बावनदी, हातखंबा, रेल्वे स्टेशन, साळवी स्टॉप परिसरात प्रवाशांना वाहनांची प्रतीक्षा करत तिष्ठत राहावे लागते. चारही ठिकाणी लोकांची प्रचंड गर्दी असते. त्यात रेल्वे स्टेशन थांब्याजवळ उन्हाबरोबरच धुळीचाही सामना करावा लागत आहे. या परिसरातील कुवारबाव ते रेल्वे स्टेशनचे चौपदरीकरण झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांसाठी एसटी किंवा अन्य वाहन थांबले तर कोंडी होते. तिथे उभे राहण्यासाठीही अडचण होत आहे. साळवी स्टॉप येथे चौक असल्यामुळे चारही बाजूंनी वाहने ये-जा करीत असतात. या परिसरात एकाच बाजूचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. प्रवासी थांबा दोन्ही बाजूंना एकाच जागेवर आहे. त्यामुळे वाहनांची गैरसोय होत आहे.

* राजापूर तालुक्यात शेडअभावी प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार नीलेश राणे यांनीही पिकअप शेड उभारणीसाठी शासनाकडे मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले आणि गतवर्षी उन्हाळे-गंगातीर्थ, उन्हाळे-आग्रेवाडी, शासकीय विश्रामगृह राजापूर, हातिवले, मारुती मंदिर (हातिवले), कोंड्ये, पन्हळे, टाकेवाडी, काझीवाडी, कोंडीवळे, खरवते अशा ११ ठिकाणी पिकअप शेड मंजूर झाल्या. त्यापैकी १० पिकअप शेड उभारल्या असून कोंडीवळे, ओणी बाजारपेठेतील पिकअप शेड बांधायची आहे. यासाठी उन्हाळे-गंगातीर्थ येथील ग्रामस्थ अरविंद लांजेकर यांच्यासह काहींनी उपोषणाचा तर उन्हाळेतील महिलांसह अभिजित गुरव, अरविंद लांजेकर आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराओ घातला होता. मात्र, अजूनही महामार्गावर वाहनांची नियमित गर्दी आणि वर्दळ असलेल्या राजापूर एसटी बस डेपो, राजापूर पेट्रोल पंपनजीक, ओणी, पाचल फाटा, वाटुळ, तळगाव या ठिकाणी पिकअप शेडची आवश्यकता आहे. या थांब्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

चौकट
स्ट्रक्चर बदलल्याने शेडला विलंब

मिऱ्या-कोल्हापूर मार्गावर पालीपासून पुढे कळकदऱ्यापर्यंत सुमारे ६७ किलोमीटरचे काम आहे. त्यातील ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर ८७ प्रवासी शेड उभारल्या जाणार आहेत. शेड उभारण्यासाठी स्टीलचे साहित्य वापरण्यात येणार होते. परंतु कोकणातील हवामानाचा परिणाम होऊन स्टील लवकर गंजण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचे आयुर्मान कमी होईल. हे लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाने चिऱ्याचा वापर करून शेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरीही तिथे शेड उभारल्या गेलेल्या नाहीत, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले. स्ट्रक्चर बदलण्यात आल्याने शेड उभारण्याच्या कामाला विलंब होत आहे. त्याचा फटका यंदाच्या उन्हाळ्यात या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना सहन करावा लागणार आहे.
------

ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारली प्रवासी शेड

संगमेश्वर येथे राजवाडी बसथांब्यावर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी गतवर्षी ग्रामस्थांनी स्वतःहून तात्पुरती प्रवासी शेड उभारलेली होती. त्यासाठी लागणारे बांबू ग्रामस्थांनीच उपलब्ध केले होते. ठेकेदाराकडून दुर्लक्ष झाल्याने हा पर्याय राजवाडी येथील ग्रामस्थांनी केला होता. त्यामुळे कडाक्याच्या उन्हात वाहनांची प्रतीक्षा करत महिला, विद्यार्थी, प्रौढ यांनी तिष्ठत रहावे लागले नव्हते. राजवाडीवासीयांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले गेले. यंदाही त्याचठिकाणी तात्पुरती शेड उभारणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
--------------
चौकट

मुंबई-गोवा महामार्गावर पूर्ण प्रवासी निवारा शेडची स्थिती ः

विभाग झालेल्या शेड शिल्लक
- परशुराम घाट ते आरवली १७ ०
- आरवली ते कांटे ० २४
- कांटे ते वाकेड १० ८
- वाटूळ ते तळगाव १८ ०
- तळगाव ते कामथे ३० ०
- कामथे ते झाराप ५२ ०
-------
चौकट
सावर्डेसह बहाद्दूरशेख नाक्यावर हवी शेड

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणात चिपळूण टप्प्यातील जुन्या प्रवासी शेड काढून टाकण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणानुसार काही ठिकाणी नव्या शेड उभारण्यात आल्या. चिपळूण हद्दीतील उड्डाणपुलाचे काम वगळता बहुतांश कामे मार्गी लागली आहेत. वालोपे, चिपळूण पॉवर हाऊस, कापसाळ, कामथे, कोंडमळा, सावर्डे, खेरशेत येथे प्रवासी शेड उभारण्यात आल्या आहेत. चौपदरीकरणानंतर या राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांची संख्या वाढली आहे. चिपळूणातील बहाद्दूरशेख नाका येथे चिपळूणवरून खेड, मुंबईकडे जाणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात असतात. तिथे प्रवासी शेड उभारलेली नाही. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून दोनदा तेथे शेड उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरातील लोकांनी त्याला विरोध केला. आता उड्डाणपुलाचे काम मार्गी लागल्यावर तिथे शेड उभारली जाणार आहे. पॉवर हाऊस येथे रत्नागिरीच्या दिशेला प्रवासी शेड आहे, मात्र पलिकडच्या बाजूस शेड नसल्याने प्रवाशांना पावसाळा, उन्हाळ्यात तिष्ठत राहावे लागते. सावर्डे बाजारपेठेत प्रवाशांसह विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. प्रवाशांची गर्दी पाहता, अस्तित्वात असलेली शेड अपुरी पडत आहे. त्यामुळे शेड असूनही अनेक वेळा त्याचा उपयोग होत नाही. सावर्डेत डेरवण फाट्याजवळ शेडची आवश्यकता आहे. तिथे नियमित प्रवासी उभे असतात. त्याचा विचार राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून झालेला नाही.

कोट १
मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेवून आमदार नीलेश राणे यांनी महानार्गावर पिकअपशेड उभारणी व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याच्यातून राजापूर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी अकरा पिकअपशेड मंजूर झाल्या आहेत. मंजूरी मिळालेल्या बहुतांश पिकअपशेडची उभारणी झाली आहे. त्याबद्दल आमदार नीलेश राणे यांना धन्यवाद. कोदवली सीएनजी पंप नजीक, राजापूर एसटी बस डेपो, ओणी, पाचल फाटा, वाटुळ याठिकाणी पिकअपशेडची आवश्यकता असून त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे.
- अरविंद लाजेंकर, राजापूर

कोट २
महामार्गावरून वाहतूक सुरू असली तरी प्रवाशी व वाहनधारकांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. महामार्गाचे काम अद्याप पुर्णत्वास जात असले तरी अनेक ठिकाणी प्रवाशी शेड झालेल्या नाहीत. फरशीतिठा, कळबंस्ते, बहादूशेखनाका अशा ठिकाणी शेडची गरज असताना त्याकडे कानाडोळा केला जातो. परिणामी प्रवाशांना त्रास सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. याच दखल हायवेच्या अधिकाऱ्यांनी घ्यायला हवी.
- शंतनू रेडीज, लोटे

कोट ३
मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. रत्नागिरी ते कळकदरा या टप्प्यात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी तात्पुरत्या प्रवासी शेड उभारण्याच्या सूचना ठेकेदाराला दिलेल्या आहेत. काही ठिकाणी सावली असल्याने तशी गैरसोय होणार नाही. पावसाळ्यात काही बस थांब्यावर पत्र्याच्या शेड उभारल्या होत्या.
- अनिल पाटील, राष्ट्रीय महामार्ग विभाग

कोट ४
संगमेश्वर टप्प्यातील महामार्गाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे राजवाडी येथे गतवर्षी श्रमदानातून पिकअपशेड उभारण्यात आली होती. याविषयी संगमेश्वरच्या आमसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी रस्ता पूर्ण झाल्यानंतर तत्काळ पिकअपशेड उभारू असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे यंदाही तात्पुरती व्यवस्था आम्हाला करावी लागणार आहे. राजवाडीसह आजुबाजूच्या छोट्या-मोठ्या बसथांब्यांवर हीच परिस्थिती आहे.
- सुहास उर्फ बंड्या लिंगायत, राजवाडी
------

rat१२p४.jpg
98065
संगमेश्वर : तालुक्यात दुसऱ्या लेनचे काम सुरू असताना दुभाजकात वृक्ष लागवड झालेली नाही.
-------
महामार्गावर १६ वर्षात २० टक्केच वृक्ष लागवड

मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना १०० ते २०० वर्षांपूर्वीच्या झाडांची मोठ्याप्रमाणावर तोड झाली. एकेका वृक्षाच्या बदल्यात पाच वृक्ष लावण्याचा नियम आहे. मात्र, गेल्या १६ वर्षांत चौपदरीकरणाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले असताना वृक्ष लागवडीचा वेग २० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील प्रवास हा भकास झाला आहे, तर निवाऱ्यासाठी लोकांना प्रतिक्षा करावी लागत आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागांनी लागवडीचे नियोजन केले आहे. त्यामध्ये दुतर्फा ८८ हजार ८१ आणि मध्यभागी ११ हजार ३५२, असे एकूण ९९ हजार ४३३ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी दुतर्फा ४ हजार २२४ आणि मध्यभागी ४ हजार ९६७, अशी एकूण ९ हजार १९१ वृक्ष लागवड झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात ९९ हजार ४३३ रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट असून, त्यापैकी केवळ ९ हजार १९१ रोपांची लागवड झाली आहे. सरासरी १४.२ टक्के कार्यवाही झालेली आहे. वृक्ष लागवडीचे नियोजन पूर्णपणे चुकत आहे. उन्हाळ्यात वृक्ष लागवड करून ती जगवण्यासाठी टँकरने पाणी दिले जाते. सध्या पाऊस परतीच्या मार्गावर आहे, जमिनीत ओलावा आहे. त्यामुळे आता वृक्ष लागवड झाली तर त्या झाडांना अतिरिक्त पाणी देण्याची गरज लागणार नाही. कशेडीपासून परशुराम घाटापर्यंत उन्हाळ्यात वृक्ष लागवड झाली होती. त्याला पुरेसे पाणी मिळाले नाही, त्यामुळे झाडे सुकली. काही झाडे उनाड गुरांनी तोडून टाकली. चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर दरम्यानही हीच अवस्था आहे. रत्नागिरी-संगमेश्वर या ठिकाणी दुभाजकामध्ये अजूनही वृक्ष लागवड झालेली नाही.

कोट
मुंबई-गोवा महामार्गावर वृक्ष लागवड करण्यासाठी ठेकेदाराला सूचना केल्या आहेत. सामाजिक वनीकरण विभागाने नर्सरीमध्ये रोपे तयार केली आहेत. लहान झाडे टिकत नाहीत, ती लवकर मरतात. काही झाडे सुकली आहेत, ही वस्तुस्थिती असली तरीही तिथे नव्याने पुन्हा लागवड करण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही दिवाळीनंतर सुरू होणार आहे. रस्त्याच्या मध्यभागी आणि दुतर्फा लागवड केलेल्या झाडांना पाणी देणे आणि त्यांचे संगोपन करणे ही जबाबदारी ठेकेदाराची आहे. त्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत.
– राजेंद्र कुळकर्णी, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

माेठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शनमोडवर; आमदार संग्राम जगताप यांना नोटीस देणार; नेमकं काय प्रकरण?

Barshi fraud:'रामगिरी शुगर्स कारखान्याची जमीन गहाण'; २ कोटी १० लाखाची फसवणूक, बार्शी पोलिसांत दोन महिलांसह सात जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT