कोकण

किल्ले रायगडावर शुक्रवारी ‘दीपोत्सव’

CD

98282

किल्ले रायगडावर शुक्रवारी ‘दीपोत्सव’

सुनील पवार ः ‘शिवराज्याभिषेक दिनोत्सव’तर्फे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडतर्फे यावर्षी श्री शिवचैतन्य दीपोत्सव सोहळा शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी किल्ले रायगडावर साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली.
श्री. पवार म्हणाले की, २०१२ पासून किल्ले रायगडावर श्री शिवचैतन्य सोहळा साजरा करण्यात येत आहे. या दीपोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला जितकी वर्षे पूर्ण झाली, तितक्या संख्येत मशाली लावून महाराजांना मानवंदना देण्यात येते. मशालींच्या उजेडात साजरा होणारा हा सामूहिक स्नेहसोहळा मनाला वेगळेच समाधान आणि आनंद देऊन जातो.
सोहळ्याचे नियोजन असे ः गुरुवारी (ता. १६) रात्री ११.३० वाजता मुंबई व महाराष्ट्रातून किल्ले रायगडाकडे प्रस्थान, शुक्रवारी (ता. १७) सकाळी ९ वाजता गडपूजन, गडावरील देवतांचे पूजन. ९.३० वाजता रायगड दर्शन, दुपारी १ वाजता स्नेहभोजन, ३ वाजता फराळ वाटप, सायंकाळी ५ वाजता राजसिंहासन पूजन, ६ वाजता शिरकाई देवी, श्री जगदिश्वर, श्रीव्याडेश्वर पूजन व दीपप्रज्वलन, ६.३० वाजता श्री शिरकाई पूजा, आरती, मशालींचे प्रज्वलन, ७ वाजता पालखीचे राजदरबाराकडे प्रस्थान, ७.३० वाजता मशालीद्वारे महाराजांना मानवंदना व आरती, रात्री ८ वाजता गड पायउतार होणे, १० वाजता रायगड पायथ्याजवळ भोजन, ११ वाजता मुंबईकडे प्रयाण. अधिक महितीसाठी राहुल मांडवकर, सर्वेश चेंदूरकर, शुभम पोळ, अतिशकुमार कुशवाहा यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Workers Diwali: एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट; अग्रीम म्हणून 'इतकी' रक्कम मिळणार

Nagpur Crime : सहा महिन्यांपासून चिंतेत, ती करतेय ‘ब्लॅकमेल’; युवकाच्या आत्महत्येचा पत्रातून खुलासा, युवतीवर गुन्हा दाखल

खुशखबर! बुधवारपासून सोलापूर-मुंबई विमानसेवा; पहिल्याच विमानाने मुख्यमंत्री फडणवीस येणार सोलापूरला; 356 किलोमीटरवरील मुंबईत जाता येणार अवघ्या 2 तासात

Bihar Election 2025: बिहार निवडणूक! एनडीएमध्ये नाराजी? 'या' दोन पक्षांनी व्यक्त केली खदखद

Vaijapur News : जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षणामुळे काहींचे स्वप्न राहणार अधुरे; काहींचे चेहरे खुलले

SCROLL FOR NEXT