कोकण

रत्नागिरी- जिल्हा नगर वाचनालय, रत्नागिरीचा मानबिंदू

CD

rat१४p२.jpg-
98413
नगर वाचनालय

वारसा जपू वाचनालयाचा - लोगो

इंट्रो

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय ही संस्था म्हणजे रत्नागिरीचा मानबिंदू आहे. १९७ वर्षे झालेली ही संस्था अनेक वाचकांच्या हृदयात घर करून आहे. वाचनालयाच्या नूतनीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, वाचनालयाच्या वाटचालीनिमित्ताने...
- शिरीष दामले, रत्नागिरी
----------

जिल्हा नगर वाचनालय,
रत्नागिरीचा मानबिंदू

रत्नागिरीत इतके संपन्न वाचनालय आणि त्याचे इतके दीर्घकाळ अस्तित्व हेच मुळी तोंडात बोटे घालायला लावणारे आहे. हे वाचनालय राज्यातील सर्व वाचनालयात वैशिष्ट्यपूर्ण ठरावे. या वाचनालयाला सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास आहे आणि वर्तमान तर उत्तम आहेच आहे.
वाचनालयाची इमारत ज्या जागेत उभी होती ती जागा वाचनालयाला मिळेल का? दीर्घकाळ वाचनालयाच्या ताब्यात राहील का? की, ती आणखी कोणा बिल्डरच्या अथवा धनदांडग्यांच्या किंवा पुढाऱ्याच्या घशात जाणार का? अशा चिंतेने काही काळ वाचनालयाविषयी प्रेम, ममत्व, आपुलकी असणारे सारेच शंकीत झाले होते; मात्र रत्नागिरी शहराची संस्कृती थोर त्यामुळे रत्नागिरी शहर सुसंस्कृत आहे. या शहराचे नेतृत्व करणारे सुसंस्कृत आहेत. वाचनालयाची धुरा वाहणारेही वाचनालयाला बांधील आहेत, सुसंस्कृत आहेत, याचा पडताळा या निमित्ताने मिळाला. संस्थेची वाटचाल दोनशे वर्षाकडे होत असताना आणि संस्थेच्या जागेबाबत संभ्रम निर्माण होत असताना एका बाजूला वाचनालयाचे नेतृत्व दीपक पटवर्धन यांच्यासारख्याकडे आणि रत्नागिरीचे राजकीय नेतृत्व उदय सामंत यांच्यासारख्या नेत्याकडे हा योगायोग जुळून आला. वाचनालयाच्या जागेसाठी किती आटापिटा करावा लागला, किती काळ फायली मंत्रालयाच्या किती किती मजल्यावर नाचल्या. अखेरीस एक वेळ अशी आली की, साक्षात मंत्री उदय सामंतही निश्चित काही सांगू शकत नव्हते. अखेर सामंत यांच्या पाठिंब्याने पटवर्धन यांच्या प्रयत्नांना यश आले. आज वाचनालयाचा तीन कोटी रुपयांचा प्रकल्प त्यामध्ये मोठे सभागृह, लाखभराहून अधिक पुस्तके राहतील, असे आधुनिक दालन आणि वाचनालयाचे अत्याधुनिकीकरण हे सारे उभे राहणार आहे. याचा पहिला टप्पा पूर्ण होऊन वाचनालयाची पुस्तके जयस्तंभ येथील आधुनिक इमारतीत येऊन देवघेव सुरू होत असताना पटवर्धन आणि सामंत यांचे अभिनंदन.
नगर वाचनालय ही फक्त एक इमारत नाही, ती मोठी संस्था रत्नागिरीची एक सांस्कृतिक पताका आहे. वाचकसंख्या कमी झालेल्या काळातही वाचनसंस्कृती रूजवण्याचा जो प्रयत्न इथे होतो आहे, त्याचे प्रत्येक वाचकांनी स्वागत केले पाहिजे. वाचनालयातील पुस्तकांची संख्या एक लाख १५ हजारावर गेली, हे अभिमानास्पद आहेच; मात्र त्याहीपेक्षा अभिमानास्पद आहे ती या वाचनालयात असलेली दर्जेदार पुस्तकांची संख्या. रत्नागिरीतील वाचनालयाची कीर्ती ठिकठिकाणच्या दर्जेदार आणि अभ्यासू वाचकांपर्यंत पोहोचलेली कळली की, अतिशय आनंद वाटतो. या वाचनालयातील पुस्तकांची निवड ब्रिटिशकाळापासून न्यायमूर्तीही करत. बंद पडलेले वाचनालय न्यायमूर्ती खारेघाट यांच्या पुढाकाराने सुरू झाले. या वाचनालयाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केले. अनेक महनीय नेत्यांचे, अभ्यासकांचे पाय वाचनालयाला लागले, असा रोचक इतिहास आहे.
वाचनालयाने ८० ते ९०च्या दशकात कात टाकण्याचा प्रयत्न केला. जिल्हा नगर वाचनालयाने रत्नागिरीत एक साहित्यिक, सांस्कृतिक चळवळ चालवली. त्याने दीर्घकाळ तग धरली नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याच वाचनालयाने यशस्वीपणे भरवले होते. वाचनालयामध्ये अनेक साहित्यिक कार्यक्रम सातत्याने होत, साहित्य संस्कृती मंडळाची बैठक याच वाचनालयाचे इमारतीत झालेली आठवते. त्या वेळी साक्षात य. दि. फडके, हरी नरके अशांसारखे दिग्गज रत्नागिरीमध्ये आले होते. त्यांना भेटून श्रवणभक्ती करून आमचे कान तृप्त झाले आहेत. हिंदूसारखी कादंबरी लिहिणारे आणि त्या काळात वादग्रस्तपेक्षा लोकप्रिय असलेले भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्याची मुलाखत याच वाचनालयामुळे मला घ्यायला मिळाली. अनिल अवचट असोत अथवा गंगाधर गाडगीळ आणि त्यांच्या पत्नी, शरणकुमार लिंबाळे असोत अथवा भरतकुमार राऊत अशांच्या भेटी आणि मुलाखती घेण्याची संधी त्याच वाचनालयामुळे मिळाली. पटवर्धन आणि त्यांचा चमू यांनी वाचनालयाचा ताबा घेतल्यानंतर वाचनालयाची भौतिक प्रगती वेगाने सुरू झाली. आज वाचनालयाचा तीन कोटीचा प्रोजेक्ट पटवर्धन आणि त्यांचे सहकारी यांनी पुढे नेला आहे. गेली सुमारे २२ वर्षे वाचनालयांची प्रगती फक्त पुस्तकसंख्येची नाही. एक सांस्कृतिक व्यासपीठ म्हणून एक बौद्धिक व्यासपीठ म्हणून एक वाचन चळवळीचे केंद्र म्हणून बालक वाचकांना प्रोत्साहन देण्याचे केंद्र म्हणून किंवा जिल्हाभरात साखळी पद्धतीने वाचनालयाला पुस्तके पुरवण्याची सुविधा म्हणून काम सुरू आहे.
वाचनालयाच्या कारभाराला आणि आर्थिक कारभाराला कडक शिस्त लावली आहे. सध्याच्या मंडळाने किंवा मंडळींनी म्हणूया, वाचनालय हाती घेतल्यापासून साधारणपणे २८० पेक्षा अधिक कार्यक्रम झालेत. वाचनालयाची पुढील वाटचाल अधिकच आव्हानात्मक आहे. पैसे उभे राहिले तरी त्यातून पुस्तके वाचणारी माणसे विकत घेता येत नाहीत. त्यासाठी वाचन चळवळ रूजवावी लागते. पटवर्धन गेले अनेक वर्षे वेगवेगळ्या उपक्रमांनी ते करत आहेत. आता जबाबदारी आणि कसोटी रत्नागिरीकरांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेटला वेस्ट इंडिजची नव्हे, जगाला त्यांची गरज...; गौतम गंभीर स्ट्रेट टू हार्ट, पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधील Video

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Maharashtra Politics : विजय वडेट्टीवारांचा आरोप; सत्ताधारी महायुती निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात; अजित पवारांच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता खोटी

३ मुले आई-वडिलाविना पोरकी! पत्नीच्या चारित्र्यावर संशय; शेवटचे समजावून सांगायला गेला अन्‌ चाकूने भोसकून केला पत्नीचा खून

ओळख लपूवन सोलापूरपासून 900KM अंतरावर राहिले पती-पत्नी! भीशीतून 131 जणांना 2.69 कोटींचा गंडा; आंध्रप्रदेशात १५ महिन्यांपासून चालवत होते भजी स्टॉल

SCROLL FOR NEXT