कोकण

विकासकामांच्या जोरावर निवडणूक लढू

CD

99394

विकासकामांच्या जोरावर निवडणूक लढू

बाबा मोंडकर ः भाजपतर्फे रोजगार, पर्यटनवृद्धीसाठी भरीव कामे

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ ः पर्यटन आणि रोजगार या क्षेत्रात भाजपने केलेल्या कामाच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. पर्यटन आणि रोजगार हे एकमेकांना पूरक विषय असून, सरकारमधील भाजपचे नेते पालकमंत्री नीतेश राणे, खासदार नारायण राणे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून रोजगाराभिमुख आणि ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या दृष्टीने भरीव काम सुरू आहे, असा दावा भाजप मालवण शहर मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी सुदेश आचरेकर, विजय केनवडेकर, बाबा परब, बबलू राऊत, पंकज सादये, भाई कासवकर, अशोक तोडणकर, मोहन वराडकर, आबा हडकर, ललित चव्हाण, रोहन पेंडूरकर, सन्मेष परब, पंकज पेडणेकर, नीलम पांजरी, सेजल परब, ममता वराडकर, पूजा करलकर, शर्वरी पाटकर, वैष्णवी मोंडकर, महिमा मयेकर, अमिता निवेकर, चित्रा हरमलकर, राणी पराडकर, साक्षी आईर, मयुरी दाभोलकर, दीपाली वायंगणकर आदी उपस्थित होते.
नगरपरिषदेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपने ‘शतप्रतिशत’च्या ध्येयाने वाटचाल सुरू केली आहे. आरक्षित झालेले दहा प्रभाग आणि नगराध्यक्ष पदासाठीच्या आरक्षणाचा विचार करून वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रभाग रचनेमध्ये प्रभाग प्रमुख, आवश्यक बूथ अध्यक्ष यांची नियुक्ती तसेच आवश्यक पदांची फेरनियुक्ती करण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे. पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आणि ज्येष्ठ पदाधिकारी १०० टक्के तयारीने मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी सज्‍ज झाले आहेत. जनतेला सोबत घेऊन विकासाचे ध्येय ठेवून पुढे जात आहोत. मालवण नगरपालिका निवडणुकीत भाजप ‘१०० टक्के प्लस’ दिसेल, असा विश्वास मोंडकर यांनी व्यक्त केला.
श्री. मोंडकर म्हणाले, ‘सिंधुदुर्ग किल्ला हा या पर्यटन जिल्ह्याचे महत्त्वाचे आकर्षण आहे. या ३६० वर्षांच्या ऐतिहासिक ठेव्याची डागडूजी व्हावी, पर्यटनपूरक कामे व्हावीत, अशी शिवप्रेमी आणि पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या किल्ले प्रेरणोत्सव समिती, टीटीडीएस, पर्यटन व्यवसाय महासंघ अशा अनेक संस्थांची मागणी होती. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत सिंधुदुर्ग किल्ल्यावर एलईडी लाईट शो सुरू करण्याची मागणी होती. या कामाची सुरुवात राज्याचे भाजप अध्यक्ष आणि माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकाळात झाली होती.’
---
रोजगारवृद्धीसाठी भाजपचा प्रयत्न
पालकमंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग मालवण किल्ला एलईडी शो आणि सुशोभीकरणासाठी ७ कोटी १२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील किल्ल्यासाठी पर्यटनांतर्गत मिळालेला हा सर्वांत मोठा निधी आहे. या प्रकल्पांतर्गत दांडेश्वर मंदिरापासून मच्छीमारांना अडथळा आणणारी पद्मगडहून गेलेली वीजवाहिनी हटवून मोठे खांब उभारण्याचे काम तसेच जेटीच्या दोन्ही बाजूंनी एलईडी लाईट लावण्याचे काम सुरू झाले आहे. हा सर्वांत मोठा प्रकल्प लवकरच पूर्ण होऊन येणाऱ्या वर्षात जनतेसाठी आणि पर्यटकांसाठी खुला होईल. या कामांच्या माध्यमातून ऐतिहासिक ठेवा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा आणि स्थानिक रोजगारात वाढ करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे श्री. मोंडकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सात दिवस धोक्याचे! पावसाबाबत मोठी अपडेट समोर, हवामान विभागाकडून इशारा जारी

Lawrence Bishnoi: वेळीच स्वतःला सुधारा नाहीतर...; लॉरेन्स बिश्नोई टोळीला उघड इशारा, धमकी देणारा रोहित गोदरा नेमका कोण?

IND vs AUS: पहिला वनडे सामना हरूनही कर्णधार शुभमन गिल समाधानी; कारण सांगताना म्हणाला, 'या मॅचने आम्हाला...'

Pune Cyber Fraud : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पुण्यातील व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक

Diwali Get-Together Recipes: दिवाळी गेट-टुगेदरची मजा आणि शान वाढवा खास दुधी-अलमंड-हनी हलवा आणि कुरकुरीत छोले-कबाबसह!

SCROLL FOR NEXT