कोकण

मडुरा नाबर प्रशालेत बनविले पर्यावरणपूरक आकाशकंदील

CD

99375

मडुरा नाबर प्रशालेत बनविले
पर्यावरणपूरक आकाशकंदील
बांदा, ता. १८ ः मडुरा येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशालेत दिवाळी सणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार केले. शाळेच्या प्रांगणात रांगोळी काढून दिव्यांची सजावट करण्यात आली.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिवाळीचे सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगितले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी शुभेच्छा पत्रे तयार केली. ही शुभेच्छा पत्रे शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना पोस्टाद्वारे पाठविण्यात आली. पत्राचा प्रवास समजावण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य भाऊ वळंजू व शशी पित्रे यांच्याकडून सर्वांना उटणे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुरेश गावडे, शाळेच्या मुख्याध्यापिका नीती साळगावकर, सहशिक्षिका वेलांकनी रोड्रिस, मयुरी कासार, स्वरा राठवड, हर्षदा तळवणेकर आदी उपस्थित होते.
----
99364

परुळेतील मुले रमली किल्ल्यांच्या दुनियेत
म्हापण, ता. १८ ः दिवाळी म्हटली की नवीन कपडे, फटाके, रांगोळी, गोडधोड फराळ तर आलाच. मात्र, त्यातही बच्चे कंपनीसाठी सर्वांत आवडता विषय म्हणजे किल्ले बनवणे. महाराष्ट्रात किल्ल्यांना एक आगळे स्थान आहे. हे ऐतिहासिक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांसह त्या काळातील राजे-महाराजांनी केलेल्या पराक्रमाची साक्ष देतात.
दिवाळी सणाला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. त्याचबरोबर दिवाळीत गड किल्ले बनविण्याची परंपरा आजही कायम आहे. बच्चे कंपनीपासून महाविद्यालयीन विद्यार्थीही दिवाळीत आकर्षक, असे मातीचे किल्ले बनवितात. दिवाळी सणानिमित्त परुळे परिसरासह अन्यत्रही गड किल्ले साकारण्याची लगबग सुरू झाली आहे. परीक्षा संपल्यानंतर दिवाळीच्या सुटीचा आनंद मुलांनी घ्यायला सुरुवात केली आहे. मुलांनी गडकिल्ल्यांच्या विविध आकर्षक प्रतिकृती साकारल्या आहेत. यामध्ये प्रतापगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रत्नदुर्ग यांसारख्या किल्ल्यांच्या प्रतिकृती मुले स्वयंप्रेरणेने साकारत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : आचारसंहितेच्या धास्तीने निविदा मंजुरीसाठी धडपड; ४०० कोटीच्या कामाचे प्रस्ताव मंजूर

Hockey India League : नवनीत कौर आणि जर्मनप्रीत सिंग करणार एसजी पायपर्सचे नेतृत्व; उपकर्णधारांचीही घोषणा

मोठी बातमी! शाळा बंद आंदोलनातही सुरू होत्या २१६२ शाळा; सोलापूर जिल्ह्यातील १७,८०० शिक्षक शाळा बंद आंदोलनासून राहिले दूर

Mumbai Crime: व्हिसा नसताना भारतात आला, 72 लाखांच्या कोकेनसह पोलिसांनी पकडला

Mephedrone Seized : हडपसरमध्ये मेफेड्रोन विक्री करणाऱ्यास अटक, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT