कोकण

पोलिसांची दिवाळी ज्येष्ठांसोबत; संवाद, स्नेह, सुरक्षेचाही संदेश

CD

99587

पोलिसांची दिवाळी ज्येष्ठांसोबत;
संवाद, स्नेह, सुरक्षेचाही संदेश

सावंतवाडी पोलिस प्रशासनातर्फे मेळावा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः येथील पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पोलिस दलाने नुकतेच ज्येष्ठ नागरिक मेळाव्यांचे आयोजन केले. पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या संकल्पनेतून आणि अपर पोलिस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्ह्यात राबवण्यात आला.
​नरक चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देणे आणि त्यांना सुरक्षेची शाश्वती देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
​सावंतवाडी पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील पोलिस ठाणे, आंबोली, सातार्डा आणि मळेवाड येथे हे मेळावे आयोजित केले होते. या चारही ठिकाणी मिळून सुमारे १४० ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. ​उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. विनोद कांबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ज्येष्ठांसाठी उपयुक्त असलेले ‘व्हाट्सॲप चॅनल समुद्र संदेश’ आणि ‘संवादातून आधार’ या चॅनेलची माहिती दिली. तसेच, सध्या वाढत असलेल्या फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबद्दल सखोल जागृती करण्यात आली. ​यावेळी पोलिसांनी दिलेल्या दिवाळीच्या शुभेच्छांमुळे आणि त्यांच्या प्रेमळ संवादामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : एखाद्या महिलेला न विचारता तिचा फोटो काढणे गुन्हा नाही, पण केव्हा? सुप्रीम कोर्टाने दिला महत्त्वाचा निकाल

International Divyang Day : रिक्षा व्यवसायाने जीवनाची गाडी रुळावर

Latur Highway Accident: इनोव्हाची दुचाकीला धडक; महिला ठार, मुलगा गंभीर, लातूर गुलबर्गा हायवेवरील नारंगवाडी पाटीजवळील वळणावर अपघात

International Divyang Day : जोडी अशी, दृष्ट काढावी तशी

Indigo Flights: IndiGo संकटात? 200 फ्लाइट्स रद्द, शेअर्स कोसळले… पण सुप्रीम कोर्टात आज नक्की काय घडणार?

SCROLL FOR NEXT