rat२४p३.jpg-
००१२७
रत्नागिरी ः मजगाव येथे विहिरीत पडलेला बिबट्या वन विभागाने पिंजऱ्यात घेऊन सुखरूप बाहेर काढले.
rat२४p४.jpg-
००१२८
बिबट्याला पिंजऱ्यात पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
-------------
विहिरीत पडलेला बिबट्या सुखरूप बाहेर
मजगाव येथील घटना; भक्ष्याचा पाठलाग करताना पडल्याचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ ः तालुक्यातील मजगाव येथील आंबाबागेतील विहिरीत एक बिबट्या पडल्याची घटना आज (ता. २३) सकाळी घडली. स्थानिक ग्रामस्थ आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे बिबट्याला रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
शहराजवळील मजगाव येथे सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास गावचे पोलिसपाटील अशोक केळकर यांनी आंबाबागेतील कठडा असलेल्या विहिरीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती पाली वनपाल यांना दूरध्वनीवरून दिली. तत्काळ ही माहिती परिक्षेत्र वनाधिकारी रत्नागिरी यांना देऊन रेस्क्यू टीमसह पिंजरा आणि आवश्यक साहित्य घटनास्थळी दाखल झाले. ही विहीर अमित अली अब्दुल हमीद काझी यांच्या मालकीच्या आंबा कलम बागेत असून, ती आयताकृती आणि कच्च्या कठड्याची आहे. विहिरीची लांबी अंदाजे १५ फूट, रूंदी १० फूट आणि खोली २५ फूट आहे. पाण्याची पातळी सुमारे ७ ते ८ फूट असून, बिबट्या विहिरीतील दगडावर बसलेला आढळून आला. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी प्रथम विहिरीभोवती जाळी टाकून परिसर सुरक्षित केला. पिंजरा दोऱ्यांच्या साहाय्याने विहिरीत सोडण्यात आला. अवघ्या १५ मिनिटांत बिबट्या सुरक्षितपणे पिंजऱ्यात अडकवण्यात यश आले. मालगुंड येथील पशुधन विकास अधिकारी स्वरूप काळे यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली असता तो पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. हा बिबट्या नर असून, त्याचे वय सुमारे ६ ते ७ वर्षे आहे. प्राथमिक अंदाजानुसार, भक्ष्याचा पाठलाग करताना तो विहिरीत पडल्याचे समजते.
ही संपूर्ण रेस्क्यू मोहीम विभागीय वनाधिकारी रत्नागिरी-चिपळूण गिरिजा देसाई तसेच सहायक वनसंरक्षक प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कार्यात परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार, वनपाल न्हानू गावडे (पाली), सारीक फकीर (लांजा), वनरक्षक विराज संसारे (रत्नागिरी), शर्वरी कदम (जाकादेवी) तसेच प्राणीमित्र शाहीद तांबोळी, ऋषिकेश जोशी, महेश धोत्रे, पोलिस अधिकारी भगवान पाटील, राजेंद्र सावंत, शरद कांबळे, रामदास कांबळे, गावचे सरपंच फैय्याज मुकादम, तंटामुक्ती अध्यक्ष बरकद मुकादम, पोलिसपाटील अशोक केळकर आणि ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.