कोकण

युवकांसाठी निबंध व काव्य स्पर्धा

CD

युवकांसाठी निबंध, रंग काव्य स्पर्धा
पावस ः रत्नागिरी येथील नवनिर्माण शिक्षणसंस्था, मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे रत्नागिरीमध्ये २२ नोव्हेंबरला रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनामध्ये युवकांसाठी काव्यवाचन तसेच निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या वाचन आणि लेखनकौशल्याला चालना देण्यासाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन गटामध्ये निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कनिष्ठ गटामध्ये अभिजात माय मराठी व मला प्रभावित केलेले मराठी पुस्तक असे निबंधाचे विषय ठेवण्यात आले आहे. वरिष्ठ गटामध्ये कोकण बोलीभाषांचे माहेरघर, अभिजात मराठी आणि माझी जबाबदारी, हे दोन विषय ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी आपले नाव, कॉलेजचे नाव, संपर्क क्रमांक नमूद करून आपला निबंध ५ नोव्हेंबरपर्यंत प्राचार्य, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय, रत्नागिरी या पत्त्यावर पाठाववेत. अधिक माहितीसाठी प्रा. संदीप कांबळे, संजय वैशंपायन, सचिन टेकाळे यांच्याशी संपर्क साधावा.

संमेलनानिमित्त काव्यवाचन स्पर्धा

पावस ः रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनानिमित्त युवारंग ही काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा चार विभागात होणार आहे. युवाशक्ती– नवभारताची कवचकुंडलं, समाजातील बदल/संवेदना आणि संघर्ष, ऑपरेशन सिंदूर : गाथा अभिमानाची, अभिजात भाषा मराठी : मी मराठी, मायमराठी या विषयावर काव्यलेखन व वाचन स्पर्धा होणार आहे. उत्तर विभागाची (मंडणगड, खेड, दापोली) स्पर्धा १० नोव्हेंबरला दापोलीतील वराडकर-बेलोसे महाविद्यालयात, ११ ला पश्चिम विभागाची (गुहागर, चिपळूण) स्पर्धा डीबीजे कॉलेजमध्ये होईल. दक्षिण विभागाची (लांजा, राजापूर) स्पर्धा ओणी हायस्कूलमध्ये १२ नोव्हेंबरला आणि मातृविभाग (रत्नागिरी, संगमेश्वर) यांची स्पर्धा नवनिर्माण महाविद्यालयात १३ नोव्हेंबरला होणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व नवोदित कवी (वयोमर्यादा १६ ते ३५ वर्षे) सहभागी होऊ शकतील. स्वरचित कविता असावी. कविता मराठी भाषेतच असावी. सादरीकरणासाठी ३ मिनिटांची वेळ दिली जाईल. ही स्पर्धा चार विभागांत घेतली जाईल.

स्मरणिकेसाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन
पावस ः रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचे यजमानपद भूषवण्याचा बहुमान रत्नागिरीतील नवनिर्माण शिक्षणसंस्थेला मिळाला आहे. हे संमेलन २२ नोव्हेंबरला रत्नागिरी एमआयडीसी येथील एस. एम. जोशी विद्यानिकेतन येथे होणार आहे. या निमित्ताने एक विशेष स्मरणिका प्रकाशित केली जाणार आहे. त्यासाठी साहित्यिक, कवी, लेखक, विद्यार्थी यांच्यासोबतच साहित्याची आवड असलेल्यांसाठी या स्मरणिकेत साहित्य पाठवण्याची संधी आहे. या स्मरणिकेसाठी ३० ऑक्टोबरपर्यंत साहित्य पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. साहित्य rtnssamelan@gmail.com या ई-मेलवर पाठवावे. लेखनाच्या शेवटी पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर व ई-मेल नमूद करावा. अधिक माहितीसाठी प्रा. प्रकाश पालांडे, सचिन टेकाळे, प्रा. अश्विनी कांबळे यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Elections: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मोठी कारवाई! ४ नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

Mumbai News: मुंबईत वाहतुकीत बदल! 'या' मार्गावर प्रवेशबंदी, 'असे' असतील पर्यायी मार्ग

मित्राची बहीण म्हणून आधी काही बोललो नाही पण... प्रसाद जवादेने सांगितली त्यांची लव्हस्टोरी; म्हणाला, 'मी तिला किती वेळा विचारलं'

Ladki Bahin Yojana: ई-केवायसी’साठी मिळाली स्थगिती; लाभार्थी महिलांनी सोडला सुटकेचा निःश्वास, सरकारचे महिलांकडून आभार

Latest Marathi News Live Update : उल्हासनगर शहरात आज दुपारपासून पावसाची जोरदार हजेरी

SCROLL FOR NEXT