-rat२४p२१.jpg-
२५O००१९१
राजापूर ः भजन करताना शामला कुलकर्णी आणि सहकारी महिला.
---
हरिहर महिला मंडळाची भक्तीधारा
गुजराळीत ३५ वर्षापूर्वी स्थापना ; अनेक स्पर्धेत चमक
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २४ ः शहरातील गुजराळी येथील महिलांनी तत्कालीन कार्यरत शिक्षिका शामला कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हरिहर महिला भजन मंडळा’ची मुहूर्तमेढ रोवली. मनोरंजनाबरोबरच भक्ती आणि उपासनेची जोड देत भजनाचे सादरीकरण करणाऱ्या या हरिहर महिला भजन मंडळाने भजनकलेमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
तीन दशकांपूर्वी भजनकलेमध्ये पुरुषांचे वर्चस्व होते. या काळामध्ये शहरातील गुजराळी येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये साजऱ्या होणाऱ्या उत्सवामध्ये महिलांची भजन करण्याची संकल्पना तब्बल ३५ वर्षापूर्वी शामला कुळकर्णी यांनी मांडली. केवळ संकल्पना न मांडता अनिता ठाकुरदेसाई, कला रानडे, कांचन लेले, ललिता रानडे, रोहिणी केळकर, निर्मला रानडे, कला आपटे, सुमित्रा रानडे या सहकारी महिलांची त्यांना साथ मिळताना त्यांच्या साथीने त्याची तत्काळ अंमलबजावणीही सुरू केली. तालुक्यातील प्रसिद्ध तबलावादक (कै.) चंद्रकांत देसाई यांची या मंडळाला तबलासाथ लाभत होती. त्यांच्यानंतर प्रमोद हर्डीकर यांची साथ मिळत होती. सद्यःस्थितीमध्ये शामला कुलकर्णी यांच्यासोबत शिल्पा मराठे, ज्योती रानडे, श्रुती ताम्हणकर, अनुजा रानडे, माधवी ढवळे, मृणाल लेले, शीतल जोशी, स्मिता कडू, तनिष्का डंबे, स्वाती संसारे, सई कडू, सुजाता बोटले, प्रतिभा रेडीज, माधवी मणचेकर या भजन सादरीकरण करत असून, त्यांना विलास करंजवकर, विजय ठाकूर, उत्तम करंबेळकर, आर्यन कुशे, वेदांत रानडे यांची साथ लाभत आहे.
हनुमान जयंती, महाशिवरात्र, गणेशजयंती, सार्वजनिक गणेशोत्सव या उत्सवांसोबत धार्मिक कार्य, पूजेच्या कार्यक्रमावेळी हरिहर महिला भजन मंडळातर्फे भजन केले जात आहे. आकाशवाणी केंद्रावर भजनकलेचे सादरीकरण करणाऱ्या या मंडळाने अनेक तालुकास्तर आणि जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होताना आपल्या भजनकलेचा विशेष ठसा उमटवला आहे.
-------
चौकट
असे झाले मंडळाचे नामकरण
गुजराळी येथील महिलांनी सुरू केलेल्या महिला भजन मंडळाचा सराव येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये नियमितपणे होत होता. राजापूरचे आराध्य दैवत श्री धूतपापेश्वर आहे. त्यामुळे धार्मिकता आणि कल्पकता यांचा संगम साधत या मंडळाचे ‘हरिहर महिला भजन मंडळ’ असे नाव ठेवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.