कोकण

कलंबिस्त दुग्ध संस्थेतर्फे सभासदांना बोनस, भेटवस्तू

CD

00231

कलंबिस्त दुग्ध संस्थेतर्फे
बोनस, भेटवस्तूंचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ ः कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित, कलंबिस्त, यांच्यातर्फे पाडवा-दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोनस वाटपाचा कार्यक्रम संस्थेच्या दूध केंद्रामध्ये आयोजित केला होता. चेअरमन ॲड. संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सुमारे २० शेतकऱ्यांना बोनसचे वाटप केले, तसेच दिवाळीनिमित्त भेटवस्तूही दिल्या.
​ संस्थेच्या या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. येत्या नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांसाठी खास कर्ज व बँक योजनेची माहिती, दुधाळ गाई-म्हशीच्या योजनांबाबतची माहिती, तसेच प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे यावेळी निश्चित केले. यावेळी संस्थेचे सचिव रमेश सावंत, संचालक लक्ष्मण राऊळ, दत्ताराम कदम, राजन घाडी, सिप्रायान रोड्रिक्स, स्वप्नील सावंत, संजय माडगूत, दाजी कुडतरकर, राजन सावंत, सिद्धेश सावंत, श्री. पवार, तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेश ऊर्फ आबा सावंत, प्रकाश सावंत, श्री. सावंत आणि आनंद बिडये आदी उपस्थित होते. सचिव रमेश सावंत यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Collector Office Bomb Alert : कोल्हापूर कलेक्टर ऑफिस बॉम्बने उडवणार, जिल्हाधिकाऱ्यांना मेल; ५ किलो आरडीएक्स, अख्खं कार्यालय खाली

Maharashtra liquor policy : राज्य सरकारची नवी 'महाराष्ट्र मद्य श्रेणी' अडचणीत?; बड्या कंपन्यांनी कोर्टात दिलं आव्हान!

Latest Marathi News Live Update : विधानभवन राडा प्रकरणी हिवाळी अधिवेशनात गदारोळ

SMAT 2025: गंभीरच्या राजकारणाचा बळी पडलेल्या गोलंदाजाने घेतली हॅटट्रिक; ट्वेंटी-२० संघातून दाखवला होता बाहेरचा रस्ता, पठ्ठ्याने...

Winter Car Care Tips: हिवाळ्यात कारच्या मेंटेनन्स चिंता मिटवा! 'या' 5 टिप्समुळे बॅटरी, टायर, इंजिन राहील परफेक्ट

SCROLL FOR NEXT