कोकण

-हर्षद गोंडाळचे चित्र ठरले देशात भारी

CD

-rat२४p१९.jpg -
P२५O००१८९
राजापूर ः हर्षद गोंडाळ याने रेखाटलेले प्रथम क्रमांक विजेते चित्र.
-rat२४p२०.jpg-
२५O००१९०
राजापूर ः मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारताना हर्षद गोंडाळ.
-----
‘विकसित भारत’ स्पर्धेत हर्षद गोंडाळ देशात अव्वल
राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा; दोनशे स्पर्धकांतून निवड, शीळवासीयांकडून कौतुक
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट यांच्या वतीने ‘विकसित भारत’ या विषयावर राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेमध्ये शीळचे सुपुत्र आणि युवा चित्रकार हर्षद गोंडाळ याने तरुण शेतकरी, वैज्ञानिक आणि कलाकार एकत्र येऊन प्रगतीचा नवा मार्ग तयार करत असलेला ‘आधुनिक, तंत्रज्ञाननिष्ठ आणि संस्कृतीने समृद्ध भारत’ या रेखाटलेल्या चित्राने देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
गोंडाळ यांनी शीळ येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक आणि राजापूर हायस्कूल व गोडे-दाते कनिष्ठ महाविद्यालय येथे माध्यमिक आणि बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. त्यामध्ये करिअर करण्याच्या उद्देशाने मुंबई येथील मुद्रा कला निकेतनमध्ये फाउंडेशन डिप्लोमा आणि वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेजमध्ये चित्रकलेची पदवी संपादन केली. सध्या डीवाय पाटील संस्थेच्या ज्ञानपुष्प विद्यानिकेतन स्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट यांच्यावतीने ‘विकसित भारत’ या विषयावर राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. वेगवेगळ्या गटांमध्ये घेण्यात आलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये देशभरातील दोनशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये हर्षद याने रेखाटलेल्या चित्राला प्रथम क्रमांक मिळाला असून, त्याला मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

चौकट
हर्षदने रेखाटलेल्या चित्रातील संदेश
आधुनिक भारतातील बदलते रूप, मेट्रो, मोनोरेल, रस्ते, उंच इमारती, शहरीकरणासोबत येणारी आव्हाने या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. एका बाजूला विकासाच्या नावाखाली झाडांची तोड दाखवण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला वृक्षारोपण आणि हरितविकास दर्शवला असून, त्या द्वारे प्रगती आणि पर्यावरण यांचा संतुलित विकास असा संदेश देण्यात आला आहे. चित्राच्या मध्यभागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र आणि भारताचा नकाशा दाखवण्यात आला, जो देशाच्या एकात्मतेचे आणि विकसित भारत २०४७ या स्वप्नाचे प्रतीक आहे. चांद्रयान मिशन, सिंदूर ऑपरेशन, शिक्षण, अर्थव्यवस्था हे समाविष्ट घटक देशाच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि आर्थिक स्वावलंबनाचे द्योतक आहे. आई आणि मुलीच्या चित्राद्वारे भारतीय संस्कृतीचा मूळ आधार दर्शवते. भौमितिक आकृत्यांची गुंतागुंत तंत्रज्ञानावर आधारित विकसित भारत संकल्पना अधोरेखित करते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Winter Session 2025 : संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर पासून, सरकार अणू उर्जासह १० मोठी विधेयके मंजूर करण्याच्या तयारीत

आजचे राशिभविष्य - 23 नोव्हेंबर 2025

Sunday Morning Breakfast: रविवारी सकाळी नाश्त्यात झटपट बनवा 'पालक स्प्रींग रोल', सोपी आहे रेसिपी

Premanand Maharaj: कुंडलीत गुण तर जुळले तरीही भांडण होतात? प्रेमानंद महाराजांनी सांगितले लग्न टिकवण्यासाठी खास सिक्रेट

Chrome Users Warning : 'क्रोम युजर्स'साठी सरकारी एजन्सीने जारी केला गंभीर इशारा!

SCROLL FOR NEXT