-rat२५p१२.jpg-
२५O००४१५
दाभोळमध्ये गंध स्वरांचा या मैफलीचा गायन कार्यक्रम सर्वांच्या साथीने रंगला.
----
दाभोळात ‘गंध स्वरांचा’ सुरेल जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २५ ः दिवाळीत दाभोळ गाव स्वरांच्या झंकाराने उजळून निघाले. सागरपुत्र विद्या विकास संस्था आणि लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दाभोळ येथे ब्रह्मनाद ग्रुप निर्मित ‘गंध स्वरांचा’ ही सुरेल संगीत मैफल रंगली. या कार्यक्रमाने दाभोळच्या सांस्कृतिक परंपरेत एक नवे, सुरेल पान जोडले. ब्रह्मनाद ग्रुपचा हा दाभोळमधील पहिलाच उपक्रम असून, संगीतप्रेमींच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे तो यशस्वी ठरला.
ज्येष्ठ नागरिक अनंत महाकाळ (गुरूजी), किशोर तांबडे, नाना शिगवण आणि किरण फडणीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर अजित जोशी यांनी सादर केलेल्या ‘नमन नटवरा विस्मयकारा’ या नांदीने मैफलीचा प्रारंभ झाला. ओंकार स्वरूपा, अबीर गुलाल उधळीत रंग, तुझे नाम आले ओठी, गेला दसरा आली दिवाळी, सखी मंद झाल्या तारका, वृंदावनी वेणू वाजे, कानडा राजा पंढरीचा, गणपती गणराज, कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू अशा एकापेक्षा एक सुरेल गीतांनी रसिकांना मोहून टाकले. जिथे जिथे मी जातो, या भावपूर्ण भैरवीने मैफलीची सांगता झाली.
संगीतमय प्रवासात डॉ. आनंद गोंधळेकर, अजित जोशी, डॉ. दिलेश मुरकर, संदेश कुलाबकर, महेश सोमण, मधुकर गुरव आणि श्रावणी गोंधळेकर यांनी आपल्या अप्रतिम गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ऑर्गन/संवादिनीवर महेश सोमण आणि नाना कुलाबकर, तबल्यावर साधक मकरंद सोमण, पखवाज व तालवाद्यावर मंदार सोमण आणि संदेश कुलाबकर यांनी लयबद्धता साधली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.