कोकण

दापोलीत आज, उद्या विंटर सायक्लोथॉन

CD

आरोग्यदायी जीवनशैलीसाठी सायक्लोथॉन
दापोलीत आज, उद्या आयोजन ; ७९ वर्षांचे रायडर ठरणार आकर्षण
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २५ : आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक सायकल संस्कृतीला चालना देण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे ‘दापोली विंटर सायक्लोथॉन २०२५ – सीझन ८’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २६ व २७ ऑक्टोबरला दापोलीतील सोहनी विद्यामंदिरच्या मैदानावरून सुरू होणार आहे.
राज्यातील विविध भागांतून अनेक नामांकित सायकलस्वार या स्पर्धेत सहभागी होणार असून, यामध्ये सायकलिंग क्षेत्रातील ज्येष्ठ रायडर गौतम भिंगानिया (वय ७९, पुणे) यांचे विशेष आकर्षण ठरणार आहे. त्यांनी नुकतीच दिल्ली–कोलकाता–पुणे असा तब्बल ३४४४ किमीचा प्रवास पूर्ण केला आहे.
तसेच युरोपातील ८ देशांमधून ४ हजार किमी अंतर पार करणाऱ्या प्रसिद्ध ‘नॉर्थ केप ४०००’ स्पर्धेत सहभागी झालेले विश्वनाथन सर, तसेच अनुभवी रायडर्स विद्याधर पालकर आणि फिरोज खान हेही या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. सहभागी रायडर्सना त्यांच्या प्रेरणादायी अनुभवांमधून शिकण्याची आणि थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेत १ ते २०० किमीपर्यंतच्या विविध अंतरांच्या राईड्स होणार आहेत. त्यामध्ये ५० किमी ‘किंगफिशर सिनिक रूट’, ४ ते २०० किमी ‘शॉर्ट सिटी लूप’ आणि ‘फन राईड’ असे गट असतील. प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. ‘शॉर्ट सिटी लूप’मध्ये ७५, १००, १२५, १५०, १७५ आणि २०० किमी अंतर गाठणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे रु. ३०० ते ८०० इतकी रोख बक्षिसे तसेच काही विशेष पारितोषिके देण्यात येतील. या मार्गावर स्वयंसेवक, पिण्याचे पाणी, फळे, स्नॅक्स, बॅकअप टेम्पो आणि वैद्यकीय मदत यांची सर्व सोय आयोजकांनी केली आहे.
------
चौकट
५० किमीचा मार्ग समुद्रकिनाऱ्यावरून
५० किमी किंगफिशर सिनिक रूट हा निसर्गरम्य समुद्रकिनारी मार्ग असून तो हनी विद्यामंदिर, जालगाव, उंबर्ले, ओळगाव, किन्हळ, देवके, बुरोंडी, लाडघर, कर्दे, मुरूड, सालदुरे, पाळंदे, आसूद, दापोली असा असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Book Festival: पुस्तक महोत्सवात ५० कोटींची उलाढाल; ३० लाखांपेक्षा जास्त पुस्तकांची विक्री, साडेबारा लाख नागरिकांनी दिली भेट

Pune Accident: 'अक्कलकोटचे मायलेक रेल्वेच्या धडकेत ठार'; पिंपरी-चिंचवडमधील घटना, अंत्यविधीसाठी गावी गेले अन्..

Maharashtra Cold Wave : पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह विदर्भात थंडीचा कडाका वाढणार, किमान तापमान ८.६ अंशांवर; हवामान विभागाचा अंदाज समोर

‘परफेक्ट लूक’चा अट्टहास; देशात सौंदर्योपचारांची झपाट्याने वाढ, वर्षभरात १२.८८ लाख प्रक्रिया

Latest Marathi News Live Update : शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभ सोहळ्याला आजपासून होणार प्रारंभ

SCROLL FOR NEXT