rat२६p६.jpg-
००५२०
नरवण ःदिवाळीचा आनंद समाजात वाटु उपक्रमांतर्गत येथे फराळ वाटप करण्यात आले.
२२ गावातील ३५० कुटुंबांना फराळ, फटाके
अनुलोम संस्थेचा उपक्रम; दात्यांच्या मदतीमुळे यशस्वी
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २६ : अनुलोम संस्थेतर्फे दिवाळीचा आनंद समाजात वाटु या उपक्रमात गुहागर परिसरातील परिसरातील गरजू, दिव्यांग कुटुंबांसमवेत साजरा करण्यात आला. यामध्ये गुहागर तालुक्यातील २२ गावातील ३५० हून अधिक कुटुंबांना फराळ आणि लहान मुलांना फटकांचे वितरण करण्यात आले. नरवण येथील अनुलोम मित्र चंद्रकांत दहिवलकर यांनी सरपंच मोरे यांना सोबत घेवून दिव्यांग सुनिल केशव गुहागरकर यांच्यासह लक्ष्मी तुकाराम जामसुदकर यांना फराळ वाटप केले.
शासनाकडून मोफत धान्य मिळत असल्याने रोजच्या भाकरीची चिंता नसते परंतु सणवाराला गोडधोड करण्याइतकी परिस्थिती नाही. तसेच दररोज परिस्थितीशी सामना करताना होणाऱ्या ओढाताणीमुळे सण उत्सव साजरे करण्याची इच्छाच नाही. अशा कुटुंबांचा अनुलोम मित्रांनी शोध घेतला. या कुटुंबाना फराळ आणि या कुटुंबातील मुलांना फटाके देता यावेत यासाठी समाजालाकडे मदतीचा हात मागतिला. यातून मदतीचा ओघ सुरु झाला. १७ ऑक्टोबरला फराळाचे सर्व साहित्य आणि फटाके आल्यानंतर अनुलोम मित्रांकडे हा फराळ पोचविण्याचे नियोजन झाले. सावर्डे येथील शेंबेकर बंधुंनी अत्यंत स्वस्तदरात त्यांचा प्रसिध्द चिवडा उपलब्ध करुन दिला. ठाणे येथील बांधकाम व्यावसायिक काळे यांनी देखील या उपक्रमाकरीता मोठ्या रक्कमेची मदत दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.