कोकण

मळगावच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्नांचा निर्धार

CD

00608

मळगावच्या विकासासाठी
एकजुटीने प्रयत्नांचा निर्धार

‘परिवर्तन’च्या बैठकीत विविध चर्चा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः मळगावच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत काही ग्रामस्थांनी एकत्र येत ‘मळगाव ग्रामविकास परीवर्तन सेने’ची स्थापना केली. या परिवर्तन सेनेची बैठक नुकतीच पार पडली. यात ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी एकजुटीचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीदरम्यान गावातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज समस्या, घरपट्टी तसेच विद्यमान ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीतील भ्रष्टाचार आणि कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनासंदर्भात तीव्र चर्चा झाली. विद्यमान कार्यकारिणीच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत, त्या संदर्भातील भ्रष्टाचार जनतेसमोर आणण्याचा निर्धार उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला. यावेळी ग्रामविकास परीवर्तन सेनाच्या कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठामपणे भूमिका घेण्याचा संकल्प व्यक्त केला. ‘‘गावात १०० टक्के परिवर्तन घडवून आणूच!’’ अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले. बैठकीस ग्रामविकास परीवर्तन सेना निमंत्रक पांडुरंग राऊळ, महेश खानोलकर, राजन पटेकर, गुरुनाथ गावकर, विलास मळगावकर, बाप्पा नाटेकर, नितेश तेली, सिद्धेश आजगावकर, प्रसाद गावकर, शेखर राऊळ, मनोज राऊळ, अशोक गावकर, निखिल पुळास्कर, अनिकेत राऊळ, लवू राऊळ यांच्यासह गावातील अनेक युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात अपघाताची मालिका सुरुच! येरवड्यात नवले ब्रीज सारखाच अपघात; ७ गाड्या एकमेकांना धडकल्या...

युपीच्या 'या' शहराचे नाव मुख्यमंत्री योगींनी बदलले; धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन झाले 'पावा नगरी'

Latest Marathi News Live Update : कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा शक्यता; हवामान विभागाचा इशारा

Eknath Shinde: शिंदे पुन्हा CM? पण खरा गेम कोण खेळतोय? गणित थक्क करणारं… २ तारखेनंतरचा ‘राजकीय स्फोट’ खरा की फक्त अफवा?

Pune Traffic : नवले पूल परिसरात मोठे बदल, आता 'या' रस्त्यावरून थेट महामार्गावर प्रवेश बंद; अपघात टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT