कोकण

सेवा द्या, अन्यथा टॉवर काढून न्या!

CD

00766

सेवा द्या, अन्यथा टॉवर काढून न्या!

आयनलवासीय; ‘बीएसएनएल’ सेवा ठप्प असल्याने संताप

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २७ : आयनल गावातील ‘बीएसएनएल’ची मोबाईल सेवा गेल्या पंधरा दिवसांपासून पूर्णपणे ठप्प असून, ग्रामस्थ प्रचंड गैरसोयीचा सामना करत आहेत. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. अखेर संतप्त ग्रामस्थांनी ‘सेवा सुरू करायची नसेल तर हा टॉवरच गावातून काढून न्या,’ असा इशारा दिला आहे.
कधी काळी ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ असा प्रभावी नारा देत देशभरात जाळे विस्तारलेली ‘बीएसएनएल’ कंपनी आज गावोगाव अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. आयनल गावात टॉवर नादुरुस्त असून, गेल्या १० ते १५ दिवसांपासून कोणतेही सिग्नल उपलब्ध नाहीत. मोबाईल नेटवर्क नसल्याने फोन कॉल्स, इंटरनेट आणि ऑनलाइन व्यवहारांवर पूर्णपणे परिणाम झाला आहे. तक्रारी केल्यावरही संबंधित कर्मचारी वेळेत येत नाहीत, आले तरी आवश्यक साहित्याची कमतरता असल्याचे कारण देऊन काम अपूर्ण ठेवले जाते, अशी ग्रामस्थांची व्यथा आहे. परिणामी ‘बीएसएनएल’चे ग्राहक या ‘रामभरोसे’ सेवेला कंटाळले असून, अनेकांनी अन्य नेटवर्ककडे वळण्यास सुरुवात केली आहे.
दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात संपर्क व्यवस्था ठप्प झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे. व्यावसायिक व्यवहार, सरकारी ऑनलाइन कामे, विद्यार्थ्यांचे डिजिटल वर्ग सर्वच गोष्टींवर परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून, गावात ‘बीएसएनएल’विरोधी नाराजी स्पष्टपणे दिसत आहे.
------------
कायमस्वरुपी उपाय योजा
ग्रामस्थांनी ‘बीएसएनएल’ अधिकाऱ्यांना तातडीने भेटून सेवा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता कायमस्वरुपी उपाययोजना करून सेवा सुरळीत ठेवावी, अन्यथा गावातून टॉवर हटवावा, असा ठाम इशारा नागरिकांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भीषण दुर्घटना : एकादशीनिमित्त मंदिरात भाविकांची गर्दी, चेंगराचेंगरीत ९ जणांचा मृत्यू

Viral News: ‘नाक कटवा’ची दहशत… भूत की माणूस? नेमकं कोण कापतंय लोकांची नाकं? पीडितांनी सांगितली भीषण कहाणी

Satyacha Morcha: मुंबई पोलीस अ‍ॅक्शन मोडवर! 'सत्याचा मोर्चा'पूर्वी वाहतूक निर्बंध आणि सुरक्षितता सल्लागार जारी

Akola Accident: मलकापूर हादरले दोन अपघातांनी! भरधाव वाहनांच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा: कामांची निविदा प्रक्रिया 'सुपरफास्ट' करा; डॉ. प्रवीण गेडाम यांचे कार्यान्वयीन यंत्रणांना निर्देश

SCROLL FOR NEXT