तायक्वांदो स्पर्धेत
जिल्हा द्वितीय
चिपळूण ः तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने चिपळूण तालुक्यातील डेरवण क्रीडासंकुलात झालेल्या ३५व्या ज्युनिअर राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याने सांघिक द्वितीय स्थान पटकावले. पुमसे दुहेरी प्रकारात भार्गवी पवार व योगराज पवार यांनी सुवर्णपदक, साई सुवारे, श्रुती काळे, भार्गवी पवार यांनी सांघिकमध्ये रौप्यपदक. वैयक्तिक साई सुवारेने कास्यपदक मिळवले. फ्री स्टाईल पुमसे प्रकारात गार्गी बाकलकर सुवर्णपदक तर सांघिक साई सुवारे, दिव्या नागर, वेदांत देसाई, योगराज पवार यांनी सुवर्णपदक. वैयक्तिक तेजस भुवड, दिव्या गुरव, रूद्र नलगे यांनी रौप्यपदक मिळवले. राज्य संघटना महासचिव मिलिंद पठारे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त प्रवीण बोरसे, राज्य संघटना कोषाध्यक्ष वेंकटेशराव कररा, जिल्हा संघटना सचिव लक्ष्मण कररा, शशांक घडशी, संजय सुर्वे आदी पदाधिकाऱ्यांनी पदकप्राप्त खेळाडू व प्रशिक्षक यांचे अभिनंदन केले.
-rat२७p१९.jpg-
२५O००७८५
प्रथम क्रमांकाची रहाटेंची रांगोळी
रांगोळी स्पर्धेत
विलास रहाटे प्रथम
संगमेश्वर ः देवगड येथील युथ फोरमतर्फे आयोजित राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी विविध परंपरा आणि धर्मातील व्यक्तिचित्रे हा विषय देण्यात आला होता. रहाटे यांनी तीन फूट बाय चार फूट आकारात ही आकर्षक रांगोळी साकारली होती. उत्तर पूर्व भारतातील अरुणाचल प्रदेशातील अपातानी समाजातील वृद्ध स्त्री साकारून, त्या समाजाची वेशभूषा, दागिने, चेहऱ्यावरील पारंपरिक टॅटू आणि मोठ्या आकारातील कानातले हे त्यांचे खास सांस्कृतिक वैशिष्ट्य दाखवण्याचा उत्तम प्रयत्न या रांगोळीच्या साह्याने करून परीक्षक व प्रेक्षकांची वाहव्वा मिळवली. रहाटे यांना प्रथम क्रमांकाचे १५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेत महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा या राज्यातील अनेक स्पर्धकही सहभागी झाले होते.
जिल्हास्तरीय संरक्षण
समितीची आज सभा
रत्नागिरी ः जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक सभा मंगळवारी (ता. २८) दुपारी १२ वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयात होणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेला ज्या माजी सैनिकांना कौटुंबिक संरक्षणासंदर्भात तक्रारी असल्यास त्यांनी अर्ज व संबंधित कागदपत्रासह वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.