-Rat २७p१५ .jpg
P२५O००७५९
आग्रा : सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दुर्गसेवकांनी आग्रा येथे किल्ल्याबाहेर जनजागृती केली.
-----
सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे जनजागृती मोहीम
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २८ ः महाराष्ट्रातील १२ शिवकालीन किल्ले युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दुर्गसेवकांनी मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशातील आठ दिवसांच्या दुर्गदर्शन आणि जनजागृती मोहिमेचे आयोजन होते. या मोहिमेदरम्यान झाशी (उत्तरप्रदेश), ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) आणि आग्रा (उत्तरप्रदेश) किल्ल्यांवर १२ युनेस्को नामांकित किल्ल्यांची नावे असलेले बॅनर आणि विशेष टी शर्ट परिधान करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
ग्वाल्हेर शहर आणि आग्रा किल्ला हे आधीच युनेस्कोच्या जागतिक वारसायादीत समाविष्ट आहेत तर झाशी किल्ल्याचे नामांकन सध्या प्रक्रियेत आहे. हे तिन्ही किल्ले मराठा साम्राज्याच्या शौर्याचे साक्षीदार राहिले आहेत. दुर्गसेवकांनी या मोहिमेत स्थानिक पर्यटकांना मराठा किल्ल्यांची आणि शिवकालीन इतिहासाची सविस्तर माहिती दिली. अनेकांनी उत्साहाने बॅनरसोबत छायाचित्रे काढून या उपक्रमात सहभाग नोंदवला. या मोहिमेत सह्याद्री प्रतिष्ठानच्या गणेश रघुवीर, योगेश निवाते, सागर पाटील, ऋषिकेश जाधव आणि रोशन पाटील यांनी सहभाग घेतला. प्रतिष्ठानतर्फे यापूर्वी महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांवर भंडारा उधळून स्वच्छता आणि संवर्धन मोहिमांतून हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यात आला होता.
---
कोट
आजपर्यंत भारतातील इतर राज्यांतील काहीच किल्ले ‘हेरिटेज फोर्ट्स ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जात होते; पण आता महाराष्ट्रातील १२ शिवकालीन किल्ल्यांचा समावेश झाल्याने महाराजांच्या पराक्रमाचा गौरव जागतिक पातळीवर पोहोचेल.
- गणेश रघुवीर, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.