सुकळवाड पाताडेवाडीत विविध स्पर्धांना प्रतिसाद
‘दीपावली शो टाईम’ः चिमुकल्यांसह ज्येष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २८ : तालुक्यातील सुकळवाड येथील पाताडेवाडी उत्कर्ष मंडळातर्फे ‘दीपावली शो टाईम’ निमित्त विविध स्पर्धा २२ ते २५ ऑक्टोबर कालावधीत उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांना अंगणवाडीतील चिमुकल्यांपासून ते खुल्या गटातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
या कार्यक्रमात अनेक मनोरंजक स्पर्धांचे आयोजन केले होते. स्पर्धांचा निकाल असा ः गोलात चेंडू टाकणे (अंगणवाडी)- दुर्वा पाताडे, कार्तिक भोगले, वियान पटेल, उत्तेजनार्थ हर्ष पाताडे. माझी ओळख (अंगणवाडी)-दुर्वा पाताडे, कार्तिक भोगले, वियान पटेल, उत्तेजनार्थ हर्ष पाताडे. मेणबत्ती पेटविणे (खुला गट)-तुषार पाताडे, श्रेयश पाताडे, राहुल पाताडे. संगीत खुर्ची ः खुला गट-उमेश पाताडे, मिथिलेश पाताडे, अजिंक्य पाताडे. स्मरण स्पर्धा (पहिली ते दुसरी)-वेदांत पाताडे, हर्षल पाताडे, खुशाल मुणगेकर, रंगभरण (तिसरी ते पाचवी)-मयुरेश नेरकर, दुर्वांक पाताडे, नुपूर पाताडे. भेटकार्ड (नववी ते दहावी)-पीयूष काळसेकर, गौरव पाताडे, घनश्याम पाताडे. सुई दोरा (खुला गट)-राजेश पाताडे, गार्गी चव्हाण, हर्षल पाताडे. चमचा गोटी (खुला गट)-ओमकार पाताडे, मयुरेश नेरकर, गार्गी चव्हाण. आकाशकंदील स्पर्धा (खुला गट)-साक्षी काळसेकर, ओमकार पाताडे, दुर्वा पाताडे. किल्ले बनविणे (खुला गट)-कार्तिक पाताडे (सिंधुदुर्ग किल्ला), मितांश पाताडे (मुरुड जंजिरा), पीयूष काळसेकर (पन्हाळा), उत्तेजनार्थ-वेदांत पाताडे, मिथिलेश पाताडे, गौरव पाताडे. खेळ खेळू पैठणीचा (महिला)-प्रतीक्षा पाताडे, आराध्या पाताडे, यशश्री पाताडे. मंदिरातील रांगोळी (खुला गट)-मिथिलेश पाताडे, ओमकार पाताडे, आदेश पाताडे. फॅन्सी ड्रेस (लहान गट)-अयांश धामापूरकर, मितांश पाताडे, दुर्वा पाताडे, उत्तेजनार्थ मिहिर पाताडे. फॅन्सी ड्रेस (मोठा गट)-प्रथम ओमकार पाताडे व आदेश पाताडे, द्वितीय पूनम पाताडे, तृतीय मिथिलेश पाताडे व पीयूष काळसेकर.
आदर्श सासू-सून ः प्रथम पार्वती बागकर (सासू), सुजाता बागकर (सून). सूत्रसंचालन वैभव पाताडे यांनी केले. फनी गेम्स स्पर्धांसाठी कृष्णा पाताडे, संजय पाताडे, सुनील पाताडे व दीपक धामापूरकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. बक्षीस वितरणानंतर अध्यक्ष संजय पाताडे, खजिनदार सुनील पाताडे यांनी सर्व स्पर्धाप्रमुख, सहप्रमुख, प्रायोजक, जागृती महिला मंडळ आणि पाताडेवाडी उत्कर्ष मंडळ कार्यकारिणीचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.