कोकण

रानडुक्करांचे थैमान

CD

रानडुकरांचे थैमान
खेड : तालुक्यातील ऐनवरे परिसरात रानडुकरांनी अक्षरशः थैमान घातले आहे. सततच्या पावसामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या भातशेतीवर आता जंगली प्राण्यांनी हल्ला चढवला आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात आहे. ऐनवरे येथील शेतकरी सुरेश पोफळकर यांच्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात रानडुकरांनी अक्षरशः मळणी करून टाकली आहे. शेतीचा सगळा पसारा उद्ध्वस्त झाला असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात प्रचंड संताप आहे. पंचक्रोशीतील ऐनवरे, कुळवंडी, तिसंगी, माणी, सवेणी आणि हेदली या गावांतील शेतकरी या संकटाने हैराण झाले आहेत. तरीसुद्धा कृषी विभाग आणि वनविभागाचे अधिकारी अद्याप गावात फिरकलेले नाहीत, असे स्थानिक ग्रामस्थांचे मत आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

आंबडसमध्ये
कीर्तन महोत्सव
खेड ः तालुक्यातील काडवली येथील श्री गुरूमाऊली सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने ६ ते ८ डिसेंबरदरम्यान आंबडस येथे जनकल्याण कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या ५ वर्षांपासून कीर्तन महोत्सवातून परमार्थिक क्षेत्रातून समाजकल्याणाचा वारसा जोपासला जात असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राकेश मोरे यांनी दिली. कोकणातील वारकरी शिक्षणसंस्था येथे दिमाखात सुरू झाली आहे. आंबडस, केळणे, शेल्डी, भेलसई, चिरणी, लोटे पंचक्रोशीसह चिपळूण, खेड, संगमेश्वर, दापोली, रत्नागिरी, जिल्ह्यातील सर्व वारकरी, फडकरी, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील लोकांच्या योगदानातूनच हे साध्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर जनकल्याण कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. जनार्दन आंब्रे यांच्या आशीर्वादाने मृदुंग सम्राट पांडुरंग सुतार, प्रशांत पवार, माजी सैनिक राजाराम कदम, सुधाकर चाळके, सुरेश माने, सुशांत जाधव, संत निरंकारी मिशनशी जोडलेले नवनाथ मायनाक आणि सर्व परमार्थिक ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करून कीर्तनसेवा जपली जात आहे. या महोत्सवात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

खेड-खोपी
रस्त्याची दुरवस्था
खेड ः तालुक्यातील खेड-खोपी हा महत्त्वाचा जिल्हामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत जीर्णावस्थेत असून, या रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांसाठी मोठे संकट ठरत आहे. दररोज या मार्गावरून विद्यार्थी, शेतकरी, कामगार, व्यापारीवर्ग प्रवास करतात; मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीस गंभीर अडथळे निर्माण झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडला असून, पावसाळ्यानंतर हा मार्ग चिखलमय झाला आहे. त्यामुळे दुचाकीस्वार व वाहनधारकांना अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. खोपी व परिसरातील ग्रामस्थांनी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. या रस्त्यामुळे शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे तसेच व्यापारी व शेतकरीवर्गालाही मालवाहतुकीत अडचणी येत आहेत. ग्रामस्थांनी या दुरवस्थेबाबत वारंवार निवेदन दिले असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून हा रस्ता दुरुस्त करून नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचण दूर करावी, अशी मागणी भाजपाचे पदाधिकारी अक्षय भोसले यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India in WC Final: थँक्स टू Jesus! भारताला फायनलमध्ये पोहोचवल्यावर जेमिमा रॉड्रिग्ज भानविक झाली; म्हणाली, शतकापेक्षा भारत जिंकणं महत्त्वाचं होतं...

IND beat AUS in Semi Final: विजयी धाव अन् जेमिमा रॉड्रिग्जसा अश्रू अनावर, हरमनप्रीत कौरही रडली; मुंबईच्या पोरीने मोडला गौतम गंभीरचा विक्रम Video Viral

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय

farmer Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीबाबत महायुती सरकारचा मोठा निर्णय! खुद्द फडणवीसांनीच केली घोषणा, म्हणाले...

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

SCROLL FOR NEXT