कोकण

सदर

CD

लोगो-----------आरोग्यभान ः वैयक्तीक - सार्वजनिक
(१७ ऑक्टोबर टुडे ४)

एक मधुमेहतज्ज्ञ म्हणून रुग्ण तपासताना मधुमेहासोबत येणारे उच्च रक्तदाब, रक्तातील घातक चरबी व हृदयविकार असे आगंतुक आजार हे माझ्या रुग्णात बऱ्याच प्रमाणात आढळतात. हृदयविकार तर स्वतंत्रपणे एक मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. देशातील प्रौढ लोकसंख्येला ही समस्या मोठ्या प्रमाणात जेरीस आणत आहे व आरोग्ययंत्रणेवर भार बनत आहे. शहरातील या समस्येने आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात शिरकाव केलाला आहे.

- rat३०p१.jpg-

- डॉ. सुनील कोतकुंडे, चिपळूण

----
हृदयविकाराचा ग्रामीण भागातही शिरकाव

आजाराचा भार व मृत्यू ः भारतात हृदयविकार मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे व वाढत्या आजाराच्या प्रमाणाचा भार आरोग्ययंत्रणेवर येत आहे. २०१९ मध्ये भारतात हृदयविकाराने जवळपास १५ लाख मृत्यू झाले व हे प्रमाण वाढतच आहे. हृदयरोगाने ग्रस्त असण्याचे प्रमाण व त्याने मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्या पंधरा वर्षात झपाट्याने वाढले आहे. हृदयविकाराची सुरुवात भारतीयांमध्ये प्रगत देशांच्या तुलनेत जवळजवळ दहा वर्ष आधी होत आहे. यामुळे कष्टकरी व रोजगारक्षम लोकसंख्येला या आजाराचा भार मोठ्या प्रमाणात उचलावा लागत आहे. याचे आर्थिक व सामाजिक पडसाद खूप महत्त्वाचे ठरतात. सद्यःपरिस्थितीत शहरी भागात याचे प्रमाण ७ ते १३ टक्के तर ग्रामीण भागात २ ते ७ टक्के आहे, जे झपाट्याने वाढत आहे. पुरुषांबरोबर स्त्रियांमध्येही या आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे तसेच तरुणांमध्ये व किशोरवयीन मुलांमध्ये ही याची आता सुरुवात होताना दिसत आहे.
उच्च रक्तदाबाचे भारतात प्रमाण झपाट्याने वाढत आहे व हृदयविकार होण्याला हे एक कारण आहे. मधुमेहाचेही प्रमाण आपल्या देशात झपाट्याने वाढत आहे, ज्यामुळे हृदयविकाराची जोखीम वाढत आहे. रक्तातील वाढीव चरबी ही बैठ्या जीवनशैली, निकृष्ट आहारसंस्कृती, मेदयुक्त पदार्थ सेवन तसेच फळे, भाज्यांचा वापर घटल्याने रक्तातील वाढती चरबी ही मोठी जोखीम बनली आहे. वाढत्या शहरीकरणात हिंडायला फिरायला पुरेशा मोकळ्या जागा नसल्यामुळे लोकांची हालचाल कमी झाली आहे. त्यामुळे व्यायामाचा अभाव आहे. वाढत्या व्यसनाधीनतेमुळे दारू, तंबाखू, सिगरेट व स्क्रीन अॅडिक्शनमुळे हृदयरोगाची लागण लवकर होत आहे. आहार साक्षरतेअभावी व बाजारू अर्थव्यवस्थेमुळे उच्च उष्मांक असणारे, अतिप्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन वाढले ज्यामुळे कुपोषण व लठ्ठपणा वाढला आहे. भारत व दक्षिण आशियातील लोकांमध्ये हृदयरोगास कारणीभूत जनुकीय कारणे आढळली आहेत, ज्यामुळे आपल्याकडे हृदयरोग जास्त गंभीर ठरत असावा.
शहरीकरणाच्या रेट्यातील ताणतणावयुक्त जीवनशैली, व्यायामाचा अभाव, वाढते प्रदूषण, फास्टफूड व वर्कफ्रॉम होम संस्कृतीमुळे शरीरात आमुलाग्र बदल होत आहेत. हृदयविकार महामारी रोखायची असेल तर लोकसंख्येतील हृदयरोगाचे प्रचंड वाढलेले प्रमाण, हृदयरोगाची कमी वयात होणारी लागण, हृदयरोगामुळे वाढलेले मृत्यूचे प्रमाण, आरोग्यव्यवस्थेतील कमतरता व त्रुटी ही आव्हाने लक्षात घ्यायला हवीत.
हृदयविकार आजाराचा आरोग्ययंत्रणेवर भार कमी करायचा असेल तर विविध आव्हानांचा सामना करावा लागेल व बहुआयामी उपाय आखावे लागतील. आरोग्ययंत्रणा बळकट करत प्रगत वैद्यकीय उपचार सर्वदूर उपलब्ध करत सामाजिक व आर्थिक बाबींचाही विचार करावा लागेल.

आरोग्ययंत्रणा त्रुटी व अभाव ः भारतात सार्वजनिक आरोग्यासाठी पुरेसा निधीच खर्च केला जात नाही, ज्यामुळे आपली सार्वजनिक आरोग्य यंत्रणा कमकुवत आहे. अपुऱ्या देखरेख प्रणालीमुळे, बोकाळलेल्या भ्रष्टाचारामुळे सेवेच्या गुणवत्तेचा विषय ऐरणीवर आला आहे. उच्चतम वैद्यकीय सेवा (शासकीय व खासगी) या शहर केंद्रित असल्यामुळे ग्रामीण जनता दुर्लक्षित राहते तसेच आरोग्ययंत्रणेला साजेसा पुरेसा तजज्ज्ञ, परिचारिका, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे सेवेची चोख अंमलबजावणी करण्यात अडथळे येतात. शासकीय यंत्रणेत रिक्त पदांमुळे, अपुऱ्या साधनसामग्री तसेच औषधाच्या अपुऱ्या साठ्यामुळे रुग्णसेवेमध्ये अडथळे येतात. आपत्कालीन आरोग्यसेवा पुरेशी नसल्याने लवकर निदान व उपाय होत नाहीत. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यास बऱ्याचदा प्राथमिक आरोग्यकेंद्रात व सर्वसाधारण दवाखान्यामध्ये निदान व उपचार उपलब्ध नसल्याने मृत्यू ओढावतो.

परवडेल अशा रुग्णकेंद्रित आरोग्यसेवेचा अभाव ः अपुऱ्या सार्वजनिक आरोग्ययंत्रणेमुळे रुग्णाला व त्याच्या परिवाराला स्वतःच्या खिश्यातून प्रचंड खर्च करावा लागतो. शासकीय योजना असल्या तरी त्याची पुरेशी माहिती जनमानसात नाही व सर्व दवाखान्यात उपलब्ध नाहीत. तसेच औषधांवरचा अवाढव्य खर्च निम्न व मध्यम उत्पन्नवर्गाला परवडण्यासारखा नसतो. रुग्णाला दवाखान्यात पोचायला विलंब होतो कारण, हृदयरोगाची तोंडओळख नसते व जवळच्या डॉक्टरकडे जाण्याकडे कल असतो तसेच अपुऱ्या रुग्णवाहिका सेवा व दळणवळणातील अडचणीमुळे दवाखान्यात पोहोचण्यास विलंब होतो. महिलांमध्ये व ज्येष्ठांमध्ये हा विलंब पुरुषांपेक्षा जास्त असल्याचे आढळते. रुग्णांमध्ये जागृती नसल्यामुळे दीर्घ उपचारांकडे दुर्लक्ष केले जाते तसेच औषधांचा खर्च न परवडल्यामुळे किंवा अपुऱ्या वैद्यकीय पाठपुराव्यामुळे उपचार पूर्ण होत नाहीत यामुळे पुन्हा हृदयविकाराचा झटका येण्याची व जोखीम वाढण्याची शक्यता वाढत जाते.

आर्थिक सामाजिक व वर्तणुकीय कारणे ः हृदयरोग हा श्रीमंतांचा आजार समजला जायचा; परंतु आजच्या घडीला तंबाखूसेवन व निकृष्ट आहारमुळे निम्नवर्गातही हा रोग झपाट्याने वाढत आहे. बदलती जीवनशैली, वाढते मधुमेह व उच्च रक्तदाबाचे प्रमाण, तंबाखू व दारूचे सेवन व अतिप्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन हे सर्व स्तरांमध्ये वाढलेले आहे. सर्वसाधारण लोकांमध्ये आरोग्य साक्षरतेचा अभाव, मुख्य जोखमीबद्दल अज्ञानामुळे हृदयविकाराचा झटका ओळखणे व दीर्घ औषधांचे महत्त्व पटवणे हेही आव्हान आहे.

रोगप्रतिबंधन व वेळीच निदान ः आपल्याकडील आरोग्ययंत्रणांचा कल रोगमुक्ततेकडे जास्त आहे व रोगप्रतिबंधन करण्याकडे कमी आहे. यामुळे प्राथमिक प्रतिबंधनातील उपक्रमांचा अभाव आढळतो तसेच अपुऱ्या देखरेख प्रक्रियेमुळे चोख डाटा नसल्यामुळे आजाराचे अचूक मोजमाप करणे कठीण जाते. यामुळे आजाराचा भार वाढत असला तरी उपायांचे नियोजन करणे कठीण जाते. उच्च रक्तदाब व मधुमेह या दीर्घ आजारांचे मोजमाप अचूक नसल्याने प्राथमिक आरोग्यस्तरावर पुरेसे प्रतिबंधनात्मक उपाय होत नाहीत व हे आजार वाढत जातात व हृदयरोगास आमंत्रण ठरतात. हृदयरोगाचे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी बहुआयामी कार्यप्रणाली आखण्याची गरज आहे. प्राथमिक आरोग्ययंत्रणा बळकट करण्याची गरज आहे तसेच सर्वच दवाखान्यात (शासकीय व खासगी) हृदयविकारावर प्राथमिक उपचार उपलब्ध करण्याची तातडीची गरज आहे. तसेच भरीव सार्वजनिक आरोग्य उपक्रम राबवून जोखमीचे कारणांबद्दल जाणीवजागृती वाढवून हृदयविकाराला अटकाव होऊ शकेल. विकसित भारताची स्वप्नं पाहणाऱ्या आपल्याला आरोग्याची ही मुहूर्तमेढ आखायलाच हवी नाही का...?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India in WC Final: थँक्स टू Jesus! भारताला फायनलमध्ये पोहोचवल्यावर जेमिमा रॉड्रिग्ज भानविक झाली; म्हणाली, शतकापेक्षा भारत जिंकणं महत्त्वाचं होतं...

IND beat AUS in Semi Final: विजयी धाव अन् जेमिमा रॉड्रिग्जसा अश्रू अनावर, हरमनप्रीत कौरही रडली; मुंबईच्या पोरीने मोडला गौतम गंभीरचा विक्रम Video Viral

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय

farmer Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीबाबत महायुती सरकारचा मोठा निर्णय! खुद्द फडणवीसांनीच केली घोषणा, म्हणाले...

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

SCROLL FOR NEXT