पेजे स्मृती न्यासतर्फे
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
रत्नागिरी ः शामराव पेजे स्मृती न्यासतर्फे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी न्यास कार्यालयातून १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र भरावयाची आहेत. आवेदन पत्राची किंमत १० रुपये आहे. सकाळी ११ ते ४ या वेळात आवेदनपत्र कार्यालयात मिळणार आहेत. आवेदनपत्र दुसऱ्या व चौथ्या शनिवारी व शासकीय सुट्या वगळून मुख्य कार्यालयात मिळतील. आवेदनपत्र पूर्ण आणि सुवाच्च अक्षरात भरावे तसेच अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख २०पेक्षा जास्त असल्यास उमेदवाराचा अर्ज अपात्र ठरेल. पोस्टाने आवेदन पत्र हवी असल्यास सर्व डाकखर्चासह स्वतःच्या पत्त्याचा लिफाफा कार्यालयात पाठवावा तसेच न्यासाचे शुल्क न्यासाच्या नावे पाठवावे. पात्र उमेदवारांना जानेवारी २०२६ मध्ये शिष्यवृत्ती धनादेश पाठवण्यात येणार आहे, असे न्यासाचे अध्यक्ष अॅड. सुजित झिमण यांनी कळवले आहे. आवेदनपत्र अध्यक्ष शामराव पेजे स्मृती न्यास, ००१, तळमजला, शर्व पॅराडाईज, संगम हॉटेलच्यामागे, रेल्वेस्टेशन रोड, मिरजोळे रत्नागिरी या पत्त्यावर पाठवावीत.
खल्वायनची संगीत सभा
रत्नागिरी ः खल्वायन रत्नागिरी या संस्थेची ३१९वी मासिक संगीत सभा ८ नोव्हेंबरला सायंकाळी सहा ते ८ या वेळात येथील बसस्थानकासमोरील गोदूताई जांभेकर विद्यालयात होणार आहे. ही संगीत मैफल संजय मुळ्ये व (कै.) मंदाकिनी कान्हेरे स्मृती संगीत मैफल म्हणून होणार असून, मुंबईच्या गानहिरा पारितोषिक विजेती सावनी पारेकर यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच अभंग, नाट्यसंगीताने मैफल रंगणार आहे. मैफलीला तबला अथर्व आठल्ये व हार्मोनियम अमित ओक साथसंगत करणार आहेत. ही मैफल विनामूल्य असून, रत्नागिरीकर संगीतप्रेमींनी या मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन खल्वायन संस्थेचे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.
अंतीम मतदार याद्या
१२ नोव्हेंबरला प्रसिद्ध
रत्नागिरी ः राज्याच्या ३२ जिल्हा परिषद व ३३६ पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची मुदत २७ ऑक्टोबरपर्यंत होती; मात्र ती आता वाढवण्यात आली असून, १२ नोव्हेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अंतिम मतदार याद्या १२ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झाले आहे. यावर हरकतीही मागवल्या होत्या. आता येत्या ३१ ला अंतिम आरक्षणही जाहीर करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.