swt3016.jpg
01404
सावंतवाडी ः ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांना कोमसापतर्फे श्रध्दांजली वाहण्यात आली.
‘मालवणी’चे वेगळेपण गवाणकरांनी जपले
मान्यवरांच्या भावनाः सावंतवाडीत ‘कोमसाप’ शाखेतर्फे श्रध्दांजली
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने बुधवारी (ता. २९) सायंकाळी ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष दीपक पटेकर यांनी गवाणकर तथा नानांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कोमसाप शाखेतर्फे श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी कोमसाप सावंतवाडी सचिव राजू तावडे यांनी, मालवणीसाठीचे नानांचे योगदान विसरून चालणार नाही. कोमसाप सावंतवाडीच्या संमेलनास ते अध्यक्ष म्हणून लाभले होते, हे आमचे भाग्य होय, अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली. कोमसापमुळे गवाणकर यांच्यासारख्या मालवणीवर प्रेम करणाऱ्या महान व्यक्तिमत्वाचा सहवास लाभला. मालवणी बोलीसाठी, भाषेसाठीचे त्यांचे योगदान अजरामर राहील, असे सदस्या मंगल नाईक जोशी म्हणाल्या. मालवणी साहित्यात गवाणकर यांचे योगदान फार मोठे आहे. त्यांनी लेखन केलेले नाटक ''वस्त्रहरण'' अजरामर झाले. मालवणी भाषा हा त्यांचा श्वास होता. मालवणी बोलीचा त्यांचा वारसा ''कोमसाप''च्या माध्यमातून यापुढेही जपूया, असे ॲड. नकुल पार्सेकर यांनी सांगितले.
''वस्त्रहरण''कार गवाणकर यांचे जाणे ही साहित्य विश्वासाठी क्लेशदायक घटना आहे. नानांनी मालवणी भाषा सातासमुद्रापार नेली आणि मालवणी माणसाचं वेगळेपण त्यांनी जगाला दाखवले. मालवणी भाषेला मानाचे स्थान मिळवून दिले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपल्या वागण्या, बोलण्यात मालवणी भाषा जपली, जतन केली, तिचा प्रचार, प्रसार केला. मालवणी माणसाला मालवणी बोलीवर प्रेम करायला शिकवले, अशा भावना व्यक्त करत तालुकाध्यक्ष पटेकर यांनी आदरांजली अर्पण केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा तालुका उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव विनायक गांवस आदी सदस्य उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.