कोकण

रत्नागिरीतील बुद्धिबळपटूंची राज्यस्तरावर धडक

CD

-rat३०p९.jpg-
२५O०१३३७
रत्नागिरी : येथील बुद्धिबळपटू आयुष रायकर तर दुसऱ्या छायाचित्रात निधी मुळ्ये हिला बक्षीस देताना मान्यवर.
----
आयुष-निधीची राज्यस्तरावर धडक!
विभागस्तरीय स्पर्धेत चमक ; जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सातारा, सातारा चेस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने साताऱ्यात कोल्हापूर विभागस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा झाल्या. यात रत्नागिरीतील आयुष रायकर व निधी मुळ्ये या दोन बुद्धिबळपटूंनी चमकदार कामगिरी करत राज्यस्तरावर धडक मारली.
१४ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत पटवर्धन हायस्कूलमध्ये सहावीचा विद्यार्थी आयुष रायकर याने सहा फेऱ्यांमध्ये पाच गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. स्वतः बिगरमानांकित असलेल्या आयुषने स्पर्धेत एकूण पाच फिडे मानांकित खेळाडूंचा पराभव केला. पहिल्यांदाच विभागीय स्पर्धेत सहभागी होत असून देखील आयुषने राज्यस्तरावर धडक मारली आहे. १७ वर्षांखालील वयोगटाच्या मुलींच्या स्पर्धेत रत्नागिरीतील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये नववीत शिकणाऱ्या निधी मुळ्ये हिने सहा फेऱ्यांमध्ये साडेचार गुणांसह तृतीय स्थान पटकावले. निधीने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहत तीन सामने जिंकले व तीन बरोबरीत सोडवले. पंधरावे मानांकन असलेल्या निधीने स्वतःपेक्षा अधिक फिडे मानांकन असलेल्या अनेक खेळाडूंविरुद्ध चांगली लढत दिली. आयुष व निधी रत्नागिरी येथील बुद्धिबळ प्रशिक्षक चैतन्य भिडे यांच्या मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमीमध्ये बुद्धिबळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतात. सातारा येथे १२ ते १४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत दोघेही रत्नागिरी जिल्ह्याचे विभागातर्फे प्रतिनिधित्व करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याला ११ कोटींचा दंड, राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांनीच मोडला नियम

Success Story: 19 व्या वर्षी साक्षी राहिंज इंडियन एअर फोर्समध्ये; पिंपरणेच्या लेकीची आकाशाला गवसणी, स्वप्न उतरवलं सत्यात!

Kolhapur 60 kg Silver Robbery : थरारक! आरामबसवर दरोडा, ६० किलो चांदी लुटली; कोल्हापुरातील घटना, बस थेट पोलिस ठाण्यात...

Land Acquisition : पुरंदर विमानतळासाठी नववर्षात भूसंपादन; जमीन परतावा, दर वाढवून देण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

BMC Election : देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर 'वंचित'ची नजर; '200 उमेदवार उतरवणार रिंगणात'; प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT