कोकण

रक्तदान, हिमोग्लोबिन तपासणीला परुळे बाजार येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

swt313.jpg
01546
म्हापणः येथे आयोजित रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना प्रमाणासह भेटवस्तू देताना मान्यवर.

रक्तदान, हिमोग्लोबिन तपासणीला
परुळे बाजार येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ३१ः परुळे बाजार ग्रामपंचायत सभागृहात आयोजित रक्तदान शिबिर आणि महिला हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थांचा तसेच तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व महिला स्नेही ग्रामपंचायत अभियान अंतर्गत हे शिबिर आयोजित केले होते. ग्रामपंचायत परुळे बाजार (ता. वेंगुर्ला), युवक कला क्रीडा मंडळ परुळे, महालक्ष्मी ज्ञानवर्धिनी वाचनालय परुळे बाजार, युनिक ब्लड मोटिव्हेटर्स फाउंडेशन आणि सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. याचे उद्घाटन माजी आरोग्य सभापती निलेश सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून झाले.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दूधवडकर, सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठानचे संस्थापक प्रकाश तेंडुलकर, यशवंत गावडे, वाचनालय अध्यक्ष विजय तुळसकर, युवक कला मंडळ अध्यक्ष अमेय देसाई, लोकमान्य पतसंस्थेच्या गौरी सामंत, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, माजी सरपंच प्रदीप प्रभू, प्राजक्ता पाटकर, नमिता परुळेकर, तन्वी दूधवडकर, अभय परुळेकर, तसेच ग्रामअधिकारी शरद शिंदे, डॉ. मनिषा सावंत, पोलीस पाटील जान्हवी खडपकर, संदिप चव्हाण, शंकर घोगळे आदी उपस्थित होते.
यावेळी सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर यांनी परुळे ग्रामपंचायतीचे असे आदर्शवत उपक्रम सर्वत्र पोहोचणे गरजेचे आहे, असे सांगत रक्तदानाचे महत्त्व, त्याचे आरोग्यदायी फायदे आणि ३३ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रतिष्ठानच्या समाजोपयोगी कार्याचा आढावा घेतला. कुणालाही रक्ताची गरज भासल्यास तातडीने संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. या शिबिरात सिंधुदुर्ग विमानतळावरील सुरक्षा रक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. ग्रामविकास अधिकारी शरद शिंदे यांनी प्रस्तावना, तर आभार सुनाद राऊळ यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; ''हा निव्वळ अपघात...''

IND vs NZ, 4th T20I: इशान किशन संघातून बाहेर, सूर्यकुमारने सांगितलं कारण; कोणाला मिळाली प्लेइंग-११ मध्ये संधी?

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवारांच्या विमान अपघातातील विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला

Ajit Pawar: कुटुंबियांना भेटताच अश्रुंचा बांध फुटला, सुप्रिया सुळेंसह सुनेत्रा पवारांनी हंबरडाच फोडला; काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर

Cricketer Arrest: धक्कादायक भारताच्या माजी क्रिकेटपटूला अटक! दारूच्या नशेत ३ गाड्यांना दिली धडक

SCROLL FOR NEXT