कोकण

वाटद माध्यमिक विद्यालयल ठरले अजिंक्य

CD

-rat३p२८.jpg-
२५O०२१८६
रत्नागिरी ः विजेता ठरलेला वाटद माध्यमिक विद्यालयाचा संघ.
---
वाटद माध्यमिक विद्यालय विजयी
सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धा ; विभागीय स्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः तालुक्यातील वाटद खंडाळा येथील माध्यमिक विद्यालय भागशाळेच्या १९ वर्षाखालील मुलींच्या क्रिकेटच्या संघाने रत्नागिरी जिल्ह्याच्या शालेय सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेत दापोलीतील बेलोसे महाविद्यालयावर विजय मिळवून विजेतेपद पटकावले. या संघाची कोल्हापूर विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
खंडाळा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४ षटकात ४३ धावा केल्या. यामध्ये सलामीची मनाली नंबरे ९ धावा व सानिया महाकाळ ९ धावा यांनी १८ धावांची सलामी देऊन त्या बाद झाल्या. सानिका आलीम नाबाद १२ धावा व पूजा जाधव हिने नाबाद ७ आणि अवांतर ६ धावा मिळाल्या. दापोली संघाला जिंकण्यासाठी ४४ धावांचे आव्हान पेलवले नाही. खंडाळा संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर दापोली संघाला ४ गडी बाद २४ धावाच करता आल्या. मनाली निंबरे, सानिया महाकाळ, निधी डाफळे, पूजा जाधव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. या संघामध्ये मनाली निंबरे, सानिया महाकाळ, सानिका आलीम, पूजा जाधव, जयश्री शितप, निधी डाफळे, दिशा डाफळे, सिद्धी केसरकर, तन्वी सावंत, रिया पावस्कर, आश्लेषा लोकरे, रूताली रामाने, सलोनी कुरटे, ईश्वरी ढवळे, मृणाली बलेकर, साक्षी खापले हे खेळाडू होते. संघाला क्रीडाशिक्षक डॉ. राजेश जाधव, पल्लवी बोरकर यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: खुलताबाद तालुक्यात भाजपचा क्लीन स्वीप, तिन्ही ठिकाणी निर्णायक आघाडी

Kolhapur Zilla Parishad : शिरोळमध्ये यड्रावकर गटाला धक्का! दानोळीत राजू शेट्टींनी गड राखला, सातवेत राष्ट्रवादीचा मोठा विजय, राधानगरी तालुक्यात आबिटकरांना पहिला धक्का

Pune ZP, Panchayat Samiti Result : पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने बहुमताचा आकडा ओलांडला, पुण्यात कुठे कसा निकाल?

Solapur ZP election Results: माजी आमदार राम सातपुतेंची पत्नी विजयी, उत्तम जानकरांच्या मुलाचा पराभव; विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढला

Kankavli Zilla Parishad Election Results : कणकवलीत शिंदेंच्या शिवसेनेचे वर्चस्व! रफिक नाईक ठरले 'टफ फायटर', पण विजय गुरुप्रसाद शिंदेंचाच; रामचंद्र राऊत तिसऱ्या क्रमांकावर

SCROLL FOR NEXT